मूव्ही रिव्ह्यू: इक्का:सनी देओलने पूर्ण जीव ओतला, पण 'ढाई किलो का हाथ' देखील कमजोर पटकथेसमोर असहाय्य दिसतो
कोर्टरूम ड्रामा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सनी देओल आणि अक्षय खन्नासारख्या दमदार कलाकारांच्या उपस्थितीमुळे ‘इक्का’कडून अपेक्षा वाढतात. चित्रपट सुरुवातीला खिळवून ठेवतो, पण पुढे जात असताना तो स्वतःच्याच गुंतागुंतीत अडकतो. शेवटी, हा कोर्टरूम ड्रामापेक्षा जास्त मेलोड्रामा बनतो. चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची लांबी 2 तास 20 मिनिटे आहे. दिव्य मराठीने चित्रपटाला…