Headlines

Admin

दिल्ली-NCRमध्ये आजपासून CNG ₹1 ने महाग:दोन दिवसांत दर ₹3 ने वाढले, दिल्लीत ₹80.09 व नोएडा-गाझियाबादमध्ये ₹88.70 प्रति किलो

दिल्ली-एनसीआरमध्ये आज म्हणजेच १७ मे पासून सीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजी ८०.०९ रुपये प्रति किलो दराने मिळेल. तर नोएडा-गाझियाबादमध्ये त्याचे दर ८८.७० रुपये झाले आहेत. दोन दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल ₹३-३ रुपयांनी महागले १५…

Read More

क्वालालंपूर एअरवेजचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी:नेदरलँडहून हैदराबादला येत होते, विमानतळ हाय अलर्टवर; 4 दिवसांतील तिसरी घटना

हैदराबाद विमानतळावर नेदरलँड्समधून येणाऱ्या क्वालालंपूर एअरवेजच्या एका विमानाला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण हैदराबाद विमानतळ हाय अलर्टवर आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की विमानात बॉम्ब आहे, जो कधीही फुटू शकतो. तथापि, विमान सुरक्षितपणे हैदराबादला पोहोचले. यापूर्वी, शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता हैदराबाद विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा एक ईमेल मिळाला होता. त्यानंतर संपूर्ण विमानतळाची…

Read More

भाजप सरकारला जनतेच्या खिशाची नाही, तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी:तेल आयात करून परदेशात का विकले जातेय?- विजय वडेट्टीवार

जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणाऱ्या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा, असं सांगायची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वडेट्टीवार यांनी कडाडून टीका केली आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की,…

Read More

पुण्यतिथी, प्रकाश मेहरांनी दागिने गहाण ठेवून जंजीर बनवला:अमिताभला घेतले तेव्हा वितरक म्हणाले- हा लंबू-मूर्ख कोण, नशेत म्हणाले- मी तुला स्टार बनवले

70 च्या दशकातील गोष्ट आहे. रोमान्सचा काळ होता आणि हिंदी सिनेमाचे सुपरस्टार दिलीप कुमार होते. धर्मेंद्र यांनी त्या काळात ‘मेरा गाव मेरा देश’ (1971), ‘सीता और गीता’ (1972) यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून स्वतःला चित्रपटसृष्टीत स्थापित केले होते. वेळेनुसार त्यांना चित्रपट निर्मितीमध्ये रस वाटू लागला. कोणतीही स्क्रिप्ट आवडली की ते लगेच विकत घेत असत. ‘सीता और गीता’…

Read More

उल्हासनगरात महिलेची चपलांचा हार घालून धिंड:रोहित पवारांचा संताप; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात गत 14 तारखेला मंदिर प्रवेशाच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेली चपलांचा हार धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. समतेच्या ज्योत पेटवणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील, तर हे आपल्या सर्वांचे अपयशच आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी…

Read More

पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी 'माझं काही झालं नाही' असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे

जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून आणली. मी तर म्हणेन, आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल, तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत…

Read More

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची कथित नाराजी व पक्षाशी संबंधित इतर काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच सत्ताधारी…

Read More

नागपूर पोलिसांचा सायबर गुन्हेगारांना दणका:नागरिकांचे साडेचार कोटी रुपये आणि २३२ मोबाईल केले परत!

नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले नागरिकांचे तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये आणि चोरीला गेलेले २३२ मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ही रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. या…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि…

Read More