Headlines

BJP Leaders Allege Foreign Conspiracy; Imran Khan Faces Deportation Notice


इम्रान खान हा विदेशी नागरिक आहे त्याला भारत सोडून जावेच लागेल,आमच्या देशात होणाऱ्या आंदोलनाशी त्यांचा काय संबंध आहे.सीजेपीवाले जी अराजकता पसरवत आहेत त्यांचा आणि यांचा काय संबंध आहे असा सवाल कदम यांनी केला आहे. हे सर्व ठरवून होत आहे. हा दिपके अमेरिकेल

.

तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, अमेरिकन नागरिक असलेला इम्रान खान, पाकिस्तानमधून येणारा पैसा आणि विदेशी शक्तींच्या माध्यमातून भारतामध्ये अराजकता पसरवण्याचा मोठा षडयंत्र रचले जात आहे. इम्रान खानविरोधात मी पोलिसांकडे तक्रार दिली होती, त्यानुसार आता त्याला 28 तारखेपर्यंत भारत सोडावा लागणार आहे. परदेशातील असा कोणीही असो, मग तो इम्रान असो किंवा युसूफ, अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्या देशात कोणीही आंदोलन करू शकते. पण बाहेरच्या देशातील नागरिकांना इथे येऊन आंदोलन करण्याचा अधिकार नाही. असे प्रतिबंध सर्वच देशामध्ये आहेत.

अक्षय कुमारने देशविरोधी भूमिका घेतली नाही- बन

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत ज्या पद्धतीने पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करतात त्याच पद्धतीने इम्रान खान देशविरोधी भूमिका घेत आहे. तुमचे देशावर प्रेम असेल तर इथे रहा. पण ते इथे राहत नाही. अक्षय कुमार यांनी देशविरोधी भूमिका कधीच घेतली नाही, उलट त्यांनी जितकी शेतकऱ्यांना मदत केली तेवढी संजय राऊतांनी 25 वर्षांत खासदार निधीतून केली नाही.

इम्रान खानला नोटीस, मग शेख हसीनांचे काय?- राऊत

अभिनेता इम्रान खान याने तरुणांच्या बाजूने आंदोलनात सहभाग घेतल्याने त्याला 28 तारखेपर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस पोलिसांनी दिली आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत राऊत यांनी सरकारला सवाल विचारले. अमित शहा किंवा फडणवीसांचे सरकार काय करू शकते, हे यातून दिसते. इम्रान खानने तरुणांच्या बाजूने आवाज उठवला म्हणून त्याला देश सोडायला सांगितला. मग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जायला का सांगत नाहीत? अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार परदेशी नागरिक आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

नेमके प्रकरण काय?

अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. इम्रान 10 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी झाला होता.मुंबई पोलिसांनी इम्रान खानला 10 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. ते 22-23 जुलै रोजी नीट पेपर लीकच्या निषेधार्थ झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातही सहभागी झाला होता.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इम्रान भारतीय नागरिक नाहीत आणि तो विरोध प्रदर्शनात सहभागी झाला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

ओसीआय कार्डधारकाला घटनात्मक हक्क नाही

संविधानाच्या कलम 19 नुसार ओसीआय कार्डधारक म्हणजे परदेशी नागरिकांना राजकीय आंदोलनात सहभागी होण्याचा घटनात्मक हक्क नाही. नागरिकत्व कायदा, 1955 च्या कलम 7 डी नुसार स्थानिक कायद्यांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालय संबंधित व्यक्तीचा ओसीआय दर्जा, व्हिसा सवलत रद्द करू शकते.

हे ही वृत्त वाचा

अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस:28 ऑक्टोबरपर्यंत मुदत, अमेरिकन नागरिक असून ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात झाला होता सहभागी

अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. इम्रान 10 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी झाला होता.

मुंबई पोलिसांनी इम्रान खानला 10 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. ते 22-23 जुलै रोजी नीट पेपर लीकच्या निषेधार्थ झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातही सहभागी झाला होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इम्रान भारतीय नागरिक नाहीत आणि तो विरोध प्रदर्शनात सहभागी झाला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.