Headlines

BJP Trying To Weaken Ajit Pawar NCP In Mumbai


अमित शहा मुंबईमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट नाकारली, त्यामुळे अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असे वाटत नाही, अर्थखात्यावर अजितदादांच्या पक्षाचा अधिकार आहे, अजित पवार नसताना भा

.

रोहित पवार म्हणाले की, अर्थखाते जर हातात आले तर अनेक नाड्या हातात येत असतात, ते भाजपला आणि एकनाथ शिंदेंना नको असावे म्हणून अर्थखाते सहजासहजी मिळेल असे वाटत नाही, त्यासाठी ताकद दाखवावी लागेल आणि भांडावे लागेल.

बिल सादर होईल त्या दिवशी कोण कुठे हे स्पष्ट होईल

डिलिमिटेशन बिलाबाबत बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, येत्या 17 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. ज्या दिवशी हे बिल संसदेत सादर होईल, त्या दिवशी कोण विरोधात मतदान करते आणि कोण अचानक गायब होते, हे स्पष्ट होईल. आमचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघातील विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट होणार असून, पंतप्रधानांची वेळ मिळणे सोपे नसते. त्यामुळे या भेटीचा आणि बिलावरील मतदानाचा वेगळा अर्थ काढू नये; मतदानाच्या दिवशीच सर्वांचे पत्ते उघड होतील.

विधानसभा-लोकसभा फोडण्याचा प्लॅन

रोहित पवार पुढे म्हणाले की, डिलिमिटेशन हे केवळ एक नाव असून, वॉर्ड आणि प्रभागांसारख्या सीमा फोडून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ फोडण्याचे काम यातून केले जात आहे. असे झाल्यास देशात लोकशाही टिकणार नाही आणि भाजप यावर 2016 पासून काम करत आहे.

हे ही वृत्त वाचा

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास:हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका, कॉंग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया काय?

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ठाकरेंच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या 10 ऑगस्ट रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट विविध प्रश्नांसंदर्भात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले असले तरी, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *