महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही:रितेश देशमुखने फटकारले; धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत, असे त्याने स्पष्ट केले आहे. अभिनेता रितेश देशमुख…