Headlines

'विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपला फक्त 'अजेंडा'च दिसतो!':हर्षवर्धन सपकाळांची टीका, मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही घेतला खरपूस समाचार

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 2014 साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून फडणवीस यांच्या…

Read More

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे वीज कंपनी नरमली!:नवीन ट्रान्सफार्मरसह रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, मौजे कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्‍वासन देऊन नवीन ट्रान्सफार्मर देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु…

Read More

कोडकौतुक:कवी सुनील उबाळे यांना 'लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार' जाहीर; 25 जुलै रोजी होणार गौरव

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत…

Read More

'परीक्षा पे चर्चा' प्रमाणे आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करा:इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा, हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय – राज ठाकरे

दिल्लीत पेपरफुटी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर अन् बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, “१८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने फरफटत रुग्णालयात दाखल करण्यापासून…

Read More

Oppositions Reaction on Sadabhau Khot Terrorist Statement Over Student Protest | CJP Protest | Students Protest

सोमवारी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्ष . काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सदाभाऊ खोतांच्या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. , “ज्या नेत्यांनी आयुष्यात स्वतः इतकी वर्षे रस्त्यावर…

Read More

‘विनायकी क्रीडा महोत्सव’ 26 जुलैपासून:सात स्पर्धांमध्ये 1500 हून अधिक खेळाडू सहभागी होणार

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान २७व्या ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोलर स्केटिंग, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मल्लखांब, तायक्वांदो आणि धनुर्विद्या अशा सात विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. फाउंडेशनचे सदस्य आणि नगरसेवक सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात…

Read More

विदर्भात पाऊस सक्रिय:पुढील 3 दिवस मुसळधार पावसासह मेघगर्जना-विजांच्या कडकडाटाची शक्यता

विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या बुलेटिननुसार, मध्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे…

Read More

Mumbai Oshiwara Crime: Husband Strangles Wife Over Suspicion

पहिल्या नवऱ्याशी सतत फोनवर बोलते, या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच 25 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. शबरून ने . मिळालेल्या माहितीनुसार, मयत शबरून हिचा आरोपी सेराज अन्सारी याच्यासोबत हा दुसरा विवाह होता. मात्र, लग्न…

Read More

जंजीरा किल्ल्यावर तीन महिन्यांत भगवा फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन:सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा सरकारला इशारा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जंजीरा किल्ल्यावर सन्मानाने भगवा झेंडा लावावा. पुढील तीन महिन्यांत सरकारने ही मागणी पूर्ण न केल्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संस्थेच्या वतीने जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावल्यास त्याचे कायमस्वरूपी रक्षण…

Read More

विद्यार्थ्यांनंतर आता शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा डाव:राजू शेट्टींनी पोस्ट करत दिली स्वतःला ताब्यात घेतल्याची माहिती

केंद्र सरकारच्या ‘अमेरिकन ट्रेड डील’च्या विरोधात दिल्लीतील किसान घाटावर आंदोलन करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आणि नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. राजघाट परिसरातून आंदोलनासाठी जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर राजू शेट्टी यांचा संताप अनावर झाला असून, “मोदी सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? आता शेतकऱ्यांनाही…

Read More