Headlines

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'साठी तीन अधिकाऱ्यांची निवड:सीईओ सत्यम गांधी यांच्या हस्ते देशमुख, तेटू, नाडे यांचा सन्मान




अमरावती जिल्हा परिषदेच्या ‘वॉल ऑफ फेम’साठी जून महिन्याकरिता तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक आनंद तेटू आणि चिखलदऱ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र नाडे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल त्यांची छायाचित्रे ‘वॉल ऑफ फेम’वर झळकली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन सीईओ संजीता महापात्र यांनी हा उपक्रम सुरू केला होता. जिल्हा परिषदेच्या कामकाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही सुरू ठेवले जातील, असे सीईओ सत्यम गांधी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक आनंद तेटू आणि चिखलदऱ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र नाडे यांना ‘वॉल ऑफ फेम’जवळ निमंत्रित करून सीईओ गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. श्रीराम कुळकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, कार्यकारी अभियंता (सिंचन) सुनील जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश मुगल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी राज्य पुरस्कृत महा आवास योजनेत अमरावती जिल्ह्यास राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक आनंद तेटू यांनी आस्थापनाविषयक प्रकरणांमध्ये शून्य प्रलंबित्व साध्य करून कार्यक्षम प्रशासनाचे उदाहरण निर्माण केले आहे. तर, चिखलदऱ्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र नाडे यांनी सन २०२५-२६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह येथून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याच उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची ‘वॉल ऑफ फेम’साठी निवड करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *