Headlines

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या…

Read More

मान्सूनपूर्व कामांना वेग:आदिला नदी 97 % स्वच्छतेचा मनपाचा दावा; गाळ स्वत: उचलून 30 लाख बचत

गेल्या वर्षी आदिला नदीला पूर येऊन काही वसाहतीत पाणी शिरल्यामुळे यंदा मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. नगर अभियंता कार्यालय आणि आठ झोनच्या माध्यमातून शहरात मान्सूनपूर्व कामे कामे केली जात आहेत. आदिला नदी स्वच्छतेची जबाबदारी झोन क्रमंाक एक आणि सहाकडे आहे. यंदा नदीपात्रातील प्रवाह सुरळीत राहावा व पूर संकट येऊन नये म्हणून नदीपात्र स्वच्छतेचे काम ९७…

Read More

वैनगंगा नदीत खाजगी बोट उलटली:भंडाऱ्यामध्ये दोघे बुडाले, पाच जणांनी पोहून वाचवले प्राण

भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेथून ते एका…

Read More

मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, 'कर्जमाफी फसवी'

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा “फसवा चेहरा” उघड झाल्याचा आरोप केला आहे. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना सरसकट…

Read More

javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते…

Read More

शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र:तेजस, रश्मी ठाकरे ‘शिवतीर्थ’वर दाखल; उद्धव ठाकरे येण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘शिवतीर्थ’वर राजकीय आणि कौटुंबिक भेटीगाठींची लगबग पाहायला मिळत आहे. शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘शिवतीर्थ’वर भेट दिली. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळातही या भेटींची चर्चा रंगली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील…

Read More

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर डहाणू पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध 1 जून रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा…

Read More

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…

Read More

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:महिन्यात दुसरी दिल्लीवारी; शिवसेनेची बैठक, खासदारांशी खलबतं करणार, नाना चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले, तरी या दौऱ्यामागे…

Read More

मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सर्व घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनसुद्धा महापालिका लक्ष देत नाही….

Read More