Headlines

सोनम वांगचूक यांचे समर्थन; खामगावात विद्यार्थ्यांचे आंदोलन:विद्यार्थी कृती समितीने एसडीओंना दिले निवेदन‎

देशात आणि राज्यात होणाऱ्या शिक्षण घोटाळ्या विरोधात व सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी कृती समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर २१ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. नीट व टीईटी पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज २१ जुलै सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे…

Read More

रुग्णांच्या सेवेसाठी मोफत "आरोग्यरथ' बस धावणार!:अकोले येथून आठवड्यातून तीन दिवस मोफत बससेवा, रुग्णांना मिळाला दिलासा‎

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी (दि.२१) तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले. धामणगाव (ता.इगतपुरी, जि.नाशिक) येथील एसएमबीटी रूग्णालय मदतीने अकोलेतून रूग्णांना उपचारार्थ घेऊन जाण्यास व उपचारानंतर परत येण्यास आठवड्यातून ३ दिवस बसस्थानकाबाहेर “आरोग्यरथ” ही खाजगी मोफत रुग्ण बससेवा सुरू करण्यात आली. या गरजेच्या व दिलासादायक उपक्रमांचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. आमदार…

Read More

शिर्डीत फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांवर होणार कारवाई:दबावाला बळी न पडता कारवाई करण्याच्या उपनगराध्यक्षांच्या सूचना‎

शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर भर बाजारपेठेत झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत शहराला भयमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईचे . बैठकीनंतर शेळके म्हणाले, “यापुढे शिर्डीतील एकाही फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करू दिला जाणार नाही. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता…

Read More

धावत्या रेल्वेत महिलेची पर्स चोरणारे दोघे ताब्यात:इगतपुरी लोहमार्ग पोलिस, सुरक्षाबलाची कारवाई‎

इगतपुरी मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त तपासातून पर्दाफाश केला. या प्रकरणात एका आरोपीसह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम…

Read More

भुजबळांची मध्यस्थी; ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित:24 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णयाची अपेक्षा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎

खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या . ^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २४ जुलैच्या बैठकीत समाधानकारक निर्णय…

Read More

सफियाबादवाडी येथील 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट, घरातील सदस्य शेतात असताना उचलले टोकाचे पाऊल‎

परिसरातील सफियाबादवाडी येथील २५ वर्षीय युवकाने शेतवस्तीवरील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रवीण राजाराम जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रवीण यांचे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. आई-वडील पंढरपूरला दिंडीसोबत गेलेले होते. घरातील इतर सदस्य व पत्नी शेतात गेलेले असताना, प्रवीण यांनी राहत्या घरात गळफास घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप…

Read More

संभाजीनगरात बोगस इनपुट क्रेडिट टॅक्सद्वारे करचुकवेगिरी:136 संशयितांची नोंदणी रद्द, जीएसटी विभागाची कारवाई; व्याजासह दंडाची वसुली सुरू

जीएसटी प्रणालीतील इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) सुविधेचा गैरवापर करून १४८ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात हे रॅकेट कार्यरत होते. राहत्या घराचा पत्ता व्यावसायिक ठिकाण म्हणून दाखवून आणि प्रत्यक्षात . अनेक ठिकाणी दुकाने किंवा कार्यालये अस्तित्वातच नसल्याचे आढळले. २०२५-२६ मध्ये ३१७ संशयित करचुकवेगिरीची प्रकरणे होती. सूत्रांनी सांगितले की, वाळूज परिसरात…

Read More

पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग

आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै रोजी साजरा होत असून पंढरपुरात दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. विठ्ठल दर्शन रांगेत सध्या २० हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा अवधी लागत आहे. दर्शनरांग गोपाळपूरजवळील सोळा नंबर शेडपर्यंत गेली असून दर्शन वेग प्रति मिनिट ३२ ते ३५ आहे. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी…

Read More

नीट, टीईटी पेपरफुटी: महिला प्राचार्यांची कारवाईची मागणी:जिल्हाधिकाऱ्यांना भेटून परीक्षा व्यवस्थेत सुधारणांची मागणी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील महिला प्राचार्य संघटनेने नीट, टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली. संघटनेने म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत असून,…

Read More

मोर्शी पोलिसांकडून १२ तासांत घरफोडीचा छडा:आरोपी जेरबंद, १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी पोलिसांनी मनीमपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला १२,५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. मनीमपूर येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांचे सहाय्य घेतले. बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी बलदेव भुता धुर्वे (रा. मनीमपूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची…

Read More