Headlines

मोर्शी पोलिसांकडून १२ तासांत घरफोडीचा छडा:आरोपी जेरबंद, १२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी पोलिसांनी मनीमपूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला १२,५०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. मनीमपूर येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांचे सहाय्य घेतले. बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी बलदेव भुता धुर्वे (रा. मनीमपूर) या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीची…

Read More

अंजनगाव बारी-कोंडेश्वर रस्ता चिखलाने भरला, प्रवास बिकट:२५ कोटींच्या निधीनंतरही काम रखडले, श्रावणात भाविकांना अडचण

अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे प्रवास करणे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. येत्या काही दिवसांत श्रावण महिना सुरू होणार असल्याने कोंडेश्वर देवस्थानात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढेल, ज्यामुळे त्यांना…

Read More

पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल:मीरा कलमाडी चेअरपर्सन, डॉ. सतीश देसाई सेक्रेटरी निवड

पुण्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर नेणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांच्या निधानानंतर पुणे फेस्टिव्हलच्या विश्वस्तांची पहिली बैठक मंगळवारी संपन्न झाली. त्यामध्ये कै. सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विश्वस्तांच्या या बैठकीत पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, चेअरपर्सन पदी मीरा कलमाडी, व सेक्रेटरीपदी डॉ. सतीश देसाई यांची एकमताने निवड…

Read More

65 तांडा वस्त्यांची विकासकामे रखडली, 5 बीडीओ रडारवर:पालकमंत्र्यांनी ग्रामविकास मंत्र्यांशी संपर्क साधला; सीईओंना चौकशीचे आदेश

अमरावती जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ६५ वस्त्यांमध्ये करावयाची विकासकामे रखडली आहेत. निविदा प्रक्रिया वेळेत राबवली न गेल्याने सुमारे ५ कोटी ९५ लाख रुपयांची कामे थांबली आहेत. या हयगयीमुळे जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचा कारभार सांभाळणाऱ्या ५ गटविकास अधिकाऱ्यांवर (BDO) कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बीडीओंच्या कार्यक्षेत्रातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ६५ तांड्यांवर रस्ते, नाल्या,…

Read More

600 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी:निरोगी जीवनशैली, संतुलित आहार यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी थेट आरोग्य तपासणी करून घेतली,…

Read More

राष्ट्रवादी शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांशी भेट:पुणे शहरातील गुन्हेगारी, वाहतूक प्रश्नांवर सविस्तर चर्चा

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. सुमारे ६५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत शहरातील सुरक्षाव्यवस्था, पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि वाहतूक नियोजनासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीला आळा…

Read More

काँग्रेस काळातही पेपर फुटले- डॉ. नीलम गोऱ्हे:परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, राजकारण टाळावे

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत परीक्षांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले. परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. गोऱ्हे म्हणाल्या की, दिल्लीत कोकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सरकारने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी, या मुद्द्यावर राजकारण केले जात आहे. काँग्रेसच्या काळातही अनेकदा पेपर…

Read More

बालगंधर्वांचा 100 वर्षांहून जुना तानपुरा भेट दिला जाणार:परांजपे कुटुंबीय गोपाळ गायन समाजाला देणार ऐतिहासिक ठेवा

संगीत परंपरेचे जतन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीनिमित्त बालगंधर्वांचा ऐतिहासिक तानपुरा संस्थेला भेट देण्यात येणार आहे. पुण्यातील परांजपे कुटुंबीय हा तानपुरा गुरुवारी, २३ जुलै रोजी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या प्रारंभी सुपूर्द करतील, अशी माहिती तानपुरा जतन करणारे प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी…

Read More

'विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपला फक्त 'अजेंडा'च दिसतो!':हर्षवर्धन सपकाळांची टीका, मुख्यमंत्र्यांच्या विधानाचाही घेतला खरपूस समाचार

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 2014 साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून फडणवीस यांच्या…

Read More

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे वीज कंपनी नरमली!:नवीन ट्रान्सफार्मरसह रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, मौजे कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्‍वासन देऊन नवीन ट्रान्सफार्मर देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु…

Read More