Headlines

हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत ‎हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर‎; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात‎




वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी‎(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजार‎चौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीत‎चाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके या‎तरुणाचा मृत्यू झाला. यात सात जण‎जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर‎आहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगी‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात‎तणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्या‎वादातून काही दिवसांपासून दोन गटांत वाद‎सुरू होता. किरकोळ कुरबुरीनंतर वाद‎हाणामारीपर्यंत जात होता. मात्र पोलिस‎ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत वाद‎नेला जात नव्हता. दरम्यान, रविवारी (३१‎मे) मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांत वाद‎उफाळून आला. किरकोळ शाब्दिक‎चकमकीनंतर हाणामारीला सुरुवात झाली.‎चाकू, लोखंडी रॉड, काठ्यांचा वापर‎करण्यात आला. यात रुद्र प्रदीप दस्तके‎(२२) या तरुणाला चाकूचा जबर वार‎बसला. त्यामुळे तो खाली कोसळला.‎ या हाणामारीत शुभम दस्तके, प्रदीप‎दस्तके, प्रवीण दस्तके, तसेच दुसऱ्या‎गटातील प्रणव भवर, पंकज भवर,‎प्रल्हाद भवर, योगेश भवर हे जखमी‎झाले. हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक‎पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी‎तातडीने पोलिस कर्मचारी घेऊन‎घटनास्थळ गाठले. पोलिस आल्यानंतर‎परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस व‎नागरिकांनी जखमींना उपचारासाठी‎परभणी येथील रुग्णालयात हलवले.‎मात्र रुद्र दस्तके याचा रस्त्यातच मृत्यू‎झाला. गंभीर जखमी असलेल्या शुभम,‎प्रदीप, प्रवीण यांच्यावर परभणीच्या‎खासगी रुग्णालयातील अतिदक्षता‎विभागात उपचार सुरू आहेत. प्रणव,‎पंकज, प्रल्हाद, योगेश हे किरकोळ‎जखमी आहेत.‎ वाळू उपशाचा वाद‎असल्याची गावात चर्चा‎ या घटनेमागे वाळू उपशाचा वाद‎असल्याची चर्चा गावात सुरू आहे.‎पिंपळगाव कुटे येथील वाळू‎घाटावरून वाळू उपसा करून‎वाहतूक करण्याच्या कारणावरून‎वाद झाला. त्यातून हाणामारीची‎घटना घडल्याची चर्चा आहे. रुद्र‎दस्तके हा वाळू उपशाच्या वादातील‎बळी असल्याचेही बोलले जाते.‎ तीन महिन्यांपूर्वीच झाला होता रुद्रचा विवाह‎ मृत रुद्र दस्तके याचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या‎घटनेमुळे रुद्रचे सुखी संसाराचे स्वप्न भंगले. रुद्र व त्याचे कुटुंब‎सोमवारी (१ जून) तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणार‎होते. त्यांनी तयारीही केली होती. मात्र ही घटना घडली.‎ वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार गावातील‎वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील‎जखमींना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.‎एका गटाने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याची‎प्रक्रिया सुरू आहे. – संग्राम जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, हट्टा‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *