Headlines

पर्वती प्रकरणातील मुलीच्या आईचा संताप:माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या; वडिलांचाही सासऱ्यावर संताप

पुण्याच्या पर्वती भागात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत हा प्रकार करणाऱ्या आपल्या वडिलांना फासावर चढवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पीडित कुटुंबाने वर्षभरापूर्वीच चोरीच्या एका घटनेनंतर घरातून हाकलून लावले होते. पुण्याच्या नसरापूर येथील एका साडेतीन वर्षीय मुलीवरील…

Read More

पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी

पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था…

Read More

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील, उज्ज्वल निकम यांचा दावा

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची आहे. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असते, पण आता ममतांच्या भूमिकेमुळेच राज्यपालच या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढतील, असे ते…

Read More

धक्कादायक!:सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या लोभापोटी एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या क्रूर हत्याकांडाचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून, मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले रवींद्र…

Read More

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला

पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी नेऊन प्रस्तुत घटना कशी घडली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून गुन्ह्याची खडानखडा माहिती घेऊन पोलिस आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पु्ण्याच्या भोर तालुक्यातील…

Read More

पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा:किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण, कार्यक्रम अर्ध्यावर थांबवण्याची वेळ; VIDEO

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे यल्लमादेवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्काबुकी, आरडाओरडा आणि शिवराळ भाषेमुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण झाला, परिणामी कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुस्ते गावात प्रसिद्ध नृत्यांगना…

Read More

नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद:करमाळ्यात ब्राम्हण संघातर्फे निषेध, तहसीलदारांना निवेदन, नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी‎

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, करमाळा यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात याव . निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित बालिका उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजी-आजोबांकडे आली असताना ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह…

Read More

शक्ती कायद्यात गुन्हेगाराला 21 दिवसांत फाशीची तरतूद:कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, वर्षा गायकवाड यांचे राज्यपालांना पत्र

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांप्रकरणी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे, असा संताप…

Read More

ST NCMC Card Price Hike Warning: License Cancellation Alert

एसटी महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या ‘NCMC’ स्मार्ट कार्डांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. हे कार्ड अधिकृत दरापेक्षा जास्त किमतीला विकणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याचे निर्देश पर . नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र,…

Read More

प्राचार्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणाऱ्या तिन्ही पोलिस बडतर्फ:अजित बडे, रिल्स स्टार सोनाली हिंगेवर कारवाई

पुणे: एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन सात लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पीएसआय अजित बडे, रिल्स स्टार पोलिस कर्मचारी सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे या तिघांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. संबंधित तिन्ही पोलिस कर्मचारी हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले आहे. अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी…

Read More