चंद्रकांत पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली:बाणेर-बालेवाडीतील वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
बाणेर-बालेवाडी परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीदरम्यान बाणेर-बालेवाडी भागातील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या…