कामगार कल्याणासाठी सरकारचा मोठा निर्णय!:40 वर्षांवरील वयोगटातील कामगारांची आता दरवर्षी होणार आरोग्य तपासणी
नवीन कामगार संहितेनुसार 40 वर्षांवरील कामगारांसाठीच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचा राज्यात शुभारंभ करण्यात आला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कर्मचारी राज्य विमा योजना आयुक्त…