Headlines

शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद चिघळला:पुस्तकावर बंदी घाला गायकवाडांची मागणी, संवैधानिक मार्गाने गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार- प्रशांत आंबी

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या वाचनावरून आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. पुस्तकात महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख हवाच, अशी ठाम भूमिका मांडत गायकवाड यांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याला प्रत्युत्तर देताना, पुस्तकाचा उद्देश अनादर करणे नसून, लोकशाही मार्गाने आम्ही आमचे म्हणणे मांडणार,…

Read More

Ladki Bahin Yojana March Hafta Stuck? Rs 1500 Pending

महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता आणि थो . महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, या योजनेत पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी ही…

Read More

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला समोर:मराठी सक्तीवर सरकारचा यू-टर्न की दिलासा? चालकांना 6 महिन्यांची मुदत

मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावरून महायुती सरकारमध्येच मतभेद उघड झाले असून, काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाचा फेरविचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. परिवहन मंत्री…

Read More

विधानपरिषदेसाठी अर्जाचे फक्त दोन दिवस; उद्धव ठाकरेंचा नकार कायम:निवडणुकीत मविआची कोंडी; उमेदवारावर अद्याप एकमत नाही

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीत उमेदवार ठरवण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, केवळ दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरत आहे….

Read More

नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी…

Read More

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…

Read More

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎

तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा . बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक),…

Read More