Headlines

छत्रपती संभाजीनगर मनपाला 15.78 कोटींचा अत्याधुनिक वॉटर टॉवर:जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी, अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरची भर पडली आहे. शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा नव्हती. ही गरज…

Read More

Pune RTGS Cyber Fraud: Bank Loses ₹8.5 Lakhs

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका बँकेची सायबर चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीजीएस (RTGS) सुविधेचा वापर करून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला तातडीने पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली. . या प्रकरणी एका बँक कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तक्रारदार…

Read More

नागपुरात नव्या बांधकामांना पार्किंग अनिवार्य:वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा, अतिक्रमणांवरही कारवाईचे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार, शहरातील प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयात झालेल्या एका आढावा बैठकीत शहरातील विविध विकास प्रकल्पांवर चर्चा करताना हे निर्देश देण्यात आले. नवीन उभारण्यात येणाऱ्या भाजी…

Read More

गोंदियात कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू:शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात आल्याची शक्यता, तपास सुरू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता उघडकीस आली. मृत वाघ सुमारे ४ ते ५ वर्षांचा होता. ग्रामस्थांना विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात फिरत…

Read More

साताऱ्यात भटक्या कुत्र्याची दहशत!:जकातवाडीत एकाच दिवशी 11 जणांवर हल्ला; दोन चिमुरड्यांसह अनेकजण गंभीर जखमी

सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे एकाच दिवशी ११ जण जखमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुपारच्या सुमारास जकातवाडी ते साठेनगर या परिसरात हा प्रकार घडला. संबंधित कुत्रा आक्रमक बनून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक झडप घालत होता. त्यामुळे काही वेळ…

Read More

आशाताईंच्या निधनाने सचिन तेंडुलकरही गहिवरला:म्हणाला – आमच्यासाठी त्या कुटुंबाचाच भाग होत्या, तुमची खूप आठवण येईल

भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आपल्या आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद प्रसंगी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन आणि आशाताईंमधील नाते हे केवळ कलाकार आणि चाहता असे नव्हते, तर ते एका आई आणि मुलासारखे घट्ट होते. आशाताईंच्या…

Read More

50 पुस्तके एकाच वेळी प्रकाशित, जागतिक विक्रम:एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेने एकाच वेळी ४४ लेखकांची ५० पुस्तके प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून, सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी हा अनोखा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव…

Read More

भाऊबीजेला 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती' ओवाळणी गाणारी:माझी प्रिय बहीण मी आज गमावली, आशिष शेलारांची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री आशिष शेलार…

Read More

हातउसन्या पैशांवरून एकावर खुनी हल्ला:पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली

पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ खिमा फिरोज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०) आणि अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी,…

Read More

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही, राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न – नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते…

Read More