Headlines

बहीण पोलिस तर भाऊ सैन्यदलात दाखल:वडिलांनी खांद्यावरून काढली मिरवणूक, दापूरा गावाची ऐतिहासिक कामगिरी‎

अकोला जिल्ह्यातील अवघ्या २,२०० लोकसंख्येच्या छोट्याशा दापूरा गावातील दोन सख्या भावंडांनी एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू होऊन इतिहास घडवला आहे. नेहा निरंजन मोहोड हिने गावातून पहिली महिला महाराष्ट्र पोलिस होण्याचा बहुमान मिळवला, तर तिचा भाऊ निखिल निरंजन मोहोड हा भारतीय सैन्यदलात दाखल झाला आहे. एकाच दिवशी दोन्ही अपत्यांनी देश आणि राज्य सेवेची वर्दी परिधान केल्यामुळे…

Read More

वृक्ष लागवडच नव्हे तर संगोपनाचा संकल्प करा:विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण‎

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ५ रोजी विद्यापीठ परिसरात रस्त्याच्या दुतर्फा निंबाच्या झाडांचे ३० रोपटे लावले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले . याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना वृक्षलागवडच नव्हे तर वृक्ष संगोपनाचा संकल्प करा, असे आवाहन केले. विद्यापीठ परिसरात सद्यःस्थितीत सुमारे पाच लाख वृक्ष आहेत. तर…

Read More

तांबेवाडी तांड्यात वृक्षतोडी विरोधात वनविभागाने केली धडक कारवाई:35 टन अवैध लाकूडसाठा जप्त, शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल‎

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांवर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, तांबेवाडी तांडा…

Read More

कन्नडमधून 50 किमीचा महामार्ग; 3 उड्डाणपुलांची कामे 2 वर्षांपासून अपूर्ण:गुत्तेदाराकडून काम बंद, रस्ता खोदल्याने धुळीमुळे गैरसोय‎

कोट्यवधींचा खर्च करून उभारलेला सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग प्रारंभापासूनच प्रशासकीय उदासीनतेमुळे गैरसोयीचा ठरत आहे. दक्षिण भारताला जोडणारा व पाच राज्यांच्या दळणवळणासाठी असलेला हा महामार्ग ४५० किलोमीटरचा आहे. कन्नड तालुक्यातून हा मार्ग ५० किमीपर्यंत जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून निधीअभावी तालुक्यात ३ उड्डाणपुलांची कामे अपूर्ण स्थितीत आहे. कन्नड हद्दीच्या सुरुवातीला गल्लेबोरगाव, कन्नड शहर, अंधानेर फाटा या ठिकाणी…

Read More

सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यात

सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात वाजता सेनगाव ते हिंगोली मार्गावर पुसेगाव पाटी येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबाबत लाचलुचपतच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील…

Read More

मराठा विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय:आता OBC प्रमाणेच मिळणार सर्व शैक्षणिक सवलती, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्यात येणार आहेत. शासनाच्या या नव्या धोरणांतर्गत, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात…

Read More

शर्तभंग प्रकरणांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, निपटारा स्थानिक पातळीवर

राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत शर्तभंग प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार केवळ महसूल मंत्र्यांकडे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली…

Read More

NEET प्रकरणातील मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त:वकिलांकडून जामीन अर्ज दाखल; न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. यात अनेकांना अटक करण्यात आली आहे असून सध्या दिल्लीतील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील एक आरोपी महिला मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या जामीन अर्जावर आता 9 जून रोजी अंतिम निर्णयाची सुनावणी होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तसेच…

Read More

महिलांनी अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची गरज:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांचे प्रतिपादन

महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत मात्र अनेक वेळा महिला तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत. मात्र आता महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध पुढे येऊन तक्रार देण्याची गरज असल्याचे मत हिंगोलीच्या दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी शुक्रवारी तारीख ५ केसापूर येथे व्यक्त केले. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे पोलिस अधीक्षक निलाभव रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जनजागृती…

Read More

मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना मोठे यश:मराठा आरक्षण आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, सरकारची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन छेडले आहे. या प्रकरणी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात तब्बल 309 जणांचा बळी गेला…

Read More