Headlines

'CJP'च्या अभिजीत दीपकेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त:आई-वडिलांशी संपर्क नाही, पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची शक्यता

सोशल मीडियावरील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) माध्यमातून देशातील व्यवस्था व बेरोजगारीवर तिखट हल्ला करणाऱ्या अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दीपके यांनी स्वतः या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्यामुळे देशात खळबळ माजली आहे. परिणामी, खबरदारी म्हणून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या निवास्थानी बंदोबस्त वाढवला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील बेरोजगार तरुणांना…

Read More

कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट ब्लॉक IBच्या अहवालानंतरच:नाना पटोलेंचा आरोप; रीलसाठी स्टंटबाजी म्हणत फडणवीसांनाही टोला

देशात वाढत असलेल्या जनक्षोभाला दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी, या सोशल मीडिया हँडलचे अकाऊंट ब्लॉक आणि हॅक करण्यामागे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आयबी,चा हात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी थेट निशाणा…

Read More

हिंगोलीत इंधनाचा खडखडाट:एका बाजूला फलक, दुसऱ्या बाजूला 'कॅन'मधून छुप्या पद्धतीने डिझेल विक्री, नियमांना केराची टोपली

जिल्ह्यात इंधनासाठी मारामारी होत असतांना एकीकडे कॅनमध्ये इंधन मिळणार नाही असा फलक लाऊन त्याच पंपावर चक्क कॅममध्ये भरून इंधन दिले जात असल्याचा प्रकार होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून पंप चालकांचा हा उद्दामपणा असल्याचे बोलले जात आहे.त्यातही आपले नेहमीचे गिऱ्हाईक सांभाळण्यासाठी काही पंप चालकांकडून आटापीटा केला जात असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा…

Read More

आई रागावल्याने पाच भावंडे घरातून पळाली:पुणे पोलिसांनी तात्काळ घेतला शोध, मुले पुन्हा पालकांच्या ताब्यात

आई रागावत असल्याने पाच भावंडांनी घरातून पलायन केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली. पैसे संपल्यानंतर मुले स्वारगेट बसस्थानकात थांबली होती. त्यानंतर पालकांना याबाबतची माहिती मिळाली. पोलीस आणि पालकांनी मुलांना सुखरूप ताब्यात घेतले. अचानक एकाच घरातील पाच मुले गायब झाल्याने खळबळ उडाली होती. मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या आईने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

'नीट' लीकचा अभियांत्रिकी प्रवेशाला फटका नाही:नीटचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या 15% जागा वगळून प्रवेश प्रक्रिया राबवणार – सीईटी सेल

नीट पेपरफुटीमुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ही शक्यता फेटाळून लावली आहे. प्रस्तुत प्रवेश प्रक्रियेत सीईटी गुणांसह नीट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू केली जाईल, असे…

Read More

मुंबईत साकारणार 'नवीन मंत्रालय':एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य सरकारकडून 1601 कोटींचा निधी वर्ग, आठवडाभरात व्यवहार होणार पूर्ण!

नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या 22 मजली एअर इंडिया इमारतीच्या खरेदीचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने या इमारत खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1 हजार 601 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. खरेदी खताचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, येत्या आठवडाभरात…

Read More

महाराष्ट्रात डिझेलसाठी रात्रभर पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची गर्दी:विदर्भ-मराठवाड्यात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; रोहित पवार यांचाही सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जळगाव आणि जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत…

Read More

शिर्डीत ₹3 हजार कोटी रुपयांतून बनत आहे डिफेन्स हब:डिफेन्स ड्रोन आणि सूर्यास्त्र क्षेपणास्त्राचे हार्डवेअर बनवण्याची तयारी; राजनाथ सिंह आज उद्घाटन करणार

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात (पूर्वीचे अहमदनगर) असलेल्या शिर्डी साई मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर, राज्य कृषी विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर ‘शिर्डी डिफेन्स कॉम्प्लेक्स’ वेगाने आकार घेत आहे. येथे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. मोठे-मोठे डोम उभे आहेत आणि इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित सरकारी-खाजगी कंपन्यांचे 100 हून अधिक प्रदर्शन स्टॉल लावले जात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ…

Read More

वारकऱ्यांच्या रुपात विठ्ठल धावून आला:भीषण अपघातातून बचावल्यानंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली कृतज्ञता‎

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आयुष्यात मला सर्वकाही भरभरून मिळाले आहे. म्हणूनच आजवर मी प्रत्येक गरजू आणि सर्व समाज घटकांसाठी जेवढी करता येईल तेवढी मदत प्रामाणिकपणे करत आलो आहे. या सर्वांचे आशीर्वाद आणि विठ्ठल-रुक्मिणीची कृपा माझ्यावर आहे. पुण्याजवळ भीषण अपघात झालेला असताना वारकऱ्यांच्या रुपात खरंच माझा विठ्ठल मला वाचवण्यासाठी धावून आला,” असे भावूक उद्गार मनसे नेते दिलीप…

Read More

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:मानेगावात गुणवंतांचा गौरव, ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रांतील यशस्वींतांचा सत्कार‎

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असून अशा कार्यक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन रणजित शिंदे यांनी केले. माढा तालुक्यातील मानेगाव येथे भारतीय जनता पक्ष ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. राजकीय क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत गुणवंतांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मानेगावातील युवकांनी…

Read More