Headlines

Ramesh Mhatre Bail Stayed By Bombay High Court; Surrender By Sunday | Kalyan Doctor Assult Case


डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना शासकीय कर्तव्यावर असताना बेदम मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर्

.

मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले असून त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी उद्या, रविवार संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर म्हात्रे दिलेल्या मुदतीत विष्णूनगर पोलिसांना शरण आले नाहीत, तर त्यांच्या सर्व स्थावर (कमावलेल्या) मालमत्तांवर टाच आणण्याची (जप्तीची) कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. या सुनावणी दरम्यान रमेश म्हात्रे यांच्याविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक नोंदही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरसह दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरुवातीला अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद ऊर्फ प्रकाश निकम या तीन सह-आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मुख्य आरोपी म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत होता. सर्व बाजूंनी वाढलेल्या दबावानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

रुग्णालयाचा आडोसा आणि जामीन

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर म्हात्रे यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी वैद्यकीय कारणांचा आडोसा घेत थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान अत्यंत नाट्यमय घडामोडीत त्यांना कल्याण कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला. कनिष्ठ न्यायालयाच्या याच संशयास्पद जामीन प्रक्रियेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

डॉक्टरांना संप मागे घेण्याचे हायकोर्टाचे आवाहन

रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (IMA) राज्य शाखेने आगामी सोमवारपासून राज्यातील सर्व वैद्यकीय आणि आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवून तीव्र संप पुकारण्याची घोषणा केली होती. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रस्तावित संपाचीही गंभीर दखल घेतली.

न्यायालयाने आरोपीविरुद्ध कडक पावले उचलल्याचे स्पष्ट करत, सामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा आणि कामावर परत यावे, असे भावनिक आवाहन केले आहे.

हे ही वाचा…

कल्याण रुग्णालय प्रकरण:रमेश म्हात्रे म्हणाले, ‘महिला डॉक्टरला मारहाण नाही’, रुग्णाची आई म्हणाली, ‘बाहेर पूर आणि डॉक्टर म्हणाले सायनला न्या!’

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्या महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे. केवळ सीसीटीव्हीच्या कॅमेरा अँगलमुळे तसे दिसत आहे,” असा दावा करत म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.