माऊलींच्या मानाच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना:मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत विश्वस्त, कार्यकर्त्यांनी केले पूजन
पुणे, प्रतिनिधी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत गणपती बाप्पाला अनोखी मानवंदना दिली. यावेळी गणेशभक्तांनी ‘माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आणि ‘जय गणेश… गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केला. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि…