भरधाव कारच्या धडकेत निवृत्त वायरमनचा मृत्यू:पत्नी गंभीर, वैजापूर स्टेशन रोडवरील अपघात
शहरातील स्टेशन रोडवरील राजपाल क्लॉथ सेंटरसमोर रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महावितरणचे निवृत्त वायरमन माधव मुरलीधर दळवी (७७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पुष्पलता माधव दळवी (६७) या गंभीर जखमी झाल्या. मूळचे खंडाळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी माधव दळवी यांनी महावितरणमध्ये वायरमन म्हणून संपूर्ण सेवा खंडाळा परिसरात बजावली…