Headlines

भिंत फोडून घरफोडी; तांबेवाडीत 1.93 लाखाचा ऐवज लंपास:लेझीम पथक, धार्मिक देखावे अन् जयघोषाने दुमदुमले पाथर्डी‎

तालुक्यातील टाकळीमानूर परिसरातील तांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराची मागील भिंत फोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दादासाहेब गोपीनाथ तांबे (वय ३०, रा.तांबेवाडी,ता.पाथर ्डी) यांनी फिर्याद दिली आहे.तांबे…

Read More

Maharashtra: Thackeray Group Internal Conflict, Raut

महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष एकसंध ठेवावा. उबाठा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे अनेक गट निर्माण झाले असून पक्षातच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत महाविकास आ . नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि काँग्रेसने सुरुवातीपासून राम मंदिर उभारणीला विरोध केला, राम मंदिर…

Read More

शिर्डीतील रेल्वेस्थानकाचा 60 कोटींतून कायापालट:सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल, दोन नवीन फलाट व पाच स्टेबलिंग लाइन उभारणार‎

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येतात. ही संभाव्य गर्दी लक्षा . सध्या शिर्डी स्थानकावर तीन फलाट कार्यरत आहेत. नव्या योजनेअंतर्गत चार आणि पाच क्रमांकाचे दोन आधुनिक आयलँड फलाट उभारले जातील. तसेच रेल्वे गाड्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी…

Read More

नालेसफाईची पाहणी करणाऱ्यांना त्याच नाल्यात अंगठे धरून उभं केलं पाहिजे:महापौरांच्या दौऱ्यात मॅनहोल उघडेच कसे? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संदीप देशपांडे

मुंबईत पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच नाल्यांमध्ये अंगठे धरून उभे केले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी माणसांवर दादागिरी…

Read More

धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. ‘कोणालाही घाबरण्याचे कारण नाही’ नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस:शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांवर आजही सभागृह तापण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस विधानसभा आणि विधान परिषदेत चांगलाच वादळी ठरला. वीजदरवाढ, धर्मांतर, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजदरांवर मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही विरोधकांच्या वीजदरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन:संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय…

Read More

अचलपुरच्या दोनोडा शाळेत सुरु होणार सहावी, सातवीचा वर्ग:विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश, सुमारे 30 विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित‎

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्गदेखील सुरू होणार आहेत. इमारत पुरेशी नसल्यामुळे हे वर्ग गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटरची पायपीट करून आसेगाव पूर्णा येथे जावे लागत होते. ही पायपीट थांबविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

वाशिंबा बायपासजवळील राखेमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात:महसूल प्रशासनाने कार्यवाही करावी, स्थानिक नागरिकांची मागणी‎

वासिंबा बायपासवर राष्ट्रीय महामार्गावरील वणी रंभापूर उड्डाणपुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी नागपूरवरून थेट आणण्यात आलेली राख (फ्लाय ॲश) बोरगाव मंजू येथील वासिंबा बायपास आणि एमआयडीसी जवळील मोठ्या पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आली आहे. ही उघड्यावर साठवलेली राख आता परिसरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे.सध्या सुरू असलेल्या रखरखत्या…

Read More

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोलापूर जिल्हा बँकेचे उदाहरण पुढे…

Read More