राज्यामध्ये सध्या कोणतीही वीजटंचाई नसल्याचा केला दावा:वर्षअखेर 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार- मुख्यमंत्री
“राज्यात सध्या कोणतीही वीजटंचाई नाही. कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. आजमितीला राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही या वर्षअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. विधान परिषदेत…