Headlines

मुंबईत धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार:पावसाचे पाणी आत आल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद; तरुणाची चाकू भोसकून हत्या

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. चालत्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात केवळ लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक वादातून एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव असून, मंगळवारी रात्री १० वाजताच्या…

Read More

प्रिंट बारीक-अस्पष्ट होती, त्यामुळे चूक झाली:शोकप्रस्तावावेळच्या मराठीतील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या भाषिक चुकांवरून विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपानंतर, अध्यक्षांनी आज स्वतः समोर येत घडलेल्या प्रकाराबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. सभागृहात आपली भूमिका मांडताना राहुल नार्वेकर म्हणाले की, त्या दिवशी शोकप्रस्तावाची जी…

Read More

बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा 'महाराष्ट्रातील' नव्हे, तर 'देशातील' पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास सर्वश्रुत आहे. परंतु, बालभारतीने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ असा संकुचित करून ऐतिहासिक चूक केली होती. यावर शिक्षक संघटना आणि नेत्यांनी…

Read More

छेडछाडीच्या भीतीमुळे प्रस्तावित वाईन शॉपला महिलांचा विरोध:व्यापारी संकुलात स्थलांतराचा डाव, महिलांसह नागरिकांचे उत्पादन शुल्कला निवेदन‎

शहरातील ‘यशोधन’ इमारतीसमोरील ‘टॉप टेन इम्पेरियल’ या व्यापारी संकुलात प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपच्या स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावित दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती व्यक्त हो . उत्पादनशुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या जागेवर हे वाईन शॉप आणण्याचे नियोजन सुरू आहे, ते एक मोठे व्यापारी संकुल आहे….

Read More

‘सीताराम कारखान्या’च्या गेटवर ठिय्या:प्रदूषणामुळे खर्डीकर हैराण, धुराड्यातून पडणारी राख अन् दूषित पाण्यामुळे पिके धोक्यात‎

खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून कारखान्याच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारपा . खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम शुगर्स या कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन…

Read More

संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागताकरिता जमला भक्तांचा मेळा:हजारो भाविकांनी घेतले ‘याची देही, याची डोळा’ दर्शन‎

अकोला आषाढी वारीनिमित्त विठू माउलीच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे मंगळवारी शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, “गण गण गणात बोते’, “विठ्ठल विठ्ठल’, “ज्ञानेश्वर माऊली’ आणि “जय हरी विठ्ठला’च्या गजराने शहर दुमदुमून गेले. ७०० वारकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला. सकाळी ८ वाजता डाबकी रोड परिसरात…

Read More

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या दोन्ही शिबिरांमध्ये बाल साधकांचा प्रतिसाद लाभला. दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत…

Read More

सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎

मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही खाती उघडून घेणारा व्यक्ती अमरावती येथील राकेशकुमार झामण . दरम्यान याच गुन्ह्याच्या तपासात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने थेट गोवा गाठत तेथे अनधिकृतरीत्या सुरू असलेले सायबर…

Read More

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स . सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील…

Read More

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला मोठी कल्पकता दाखवत आहेत. त्या . नवी पेठ येथील ‘जय आनंद महावीर युवक मंडळा’च्या वतीने महिलांसाठी आयोजित ऑनलाईन पौष्टिक शाकाहारी टिफीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या…

Read More