अमरावतीत शासकीय इमारत असतानाही आदिवासी अभ्यासिकेसाठी भाड्याने जागा:आमदार खोडके यांच्या लक्षवेधीनंतर गृहपाल निलंबित, भाडे वसुलीचे आदेश
अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या अभ्यासिकेसाठी सुसज्ज शासकीय इमारत उपलब्ध असतानाही, राजकमल चौकातील एका खाजगी मॉलमध्ये दरमहा ८ लाख ६८३ रुपये भाड्याने जागा घेण्यात आली. २०२८ पर्यंतच्या या भाडेकरारामुळे गेल्या १४ महिन्यांत शासनाच्या तिजोरीतून १ कोटी १२ लाख रुपये भाड्यापोटी अदा करण्यात आले आहेत. आमदार सुलभाताई खोडके यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रकार उघड…