Headlines

विधान परिषदेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ:17 पैकी 16 जागांवर महायुतीचा गुलाल, एका जागी अपक्ष; वाचा निकाल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आलेले नाही. अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अवस्था इतकी…

Read More

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,”…

Read More

भंडारा-गोंदियात महायुतीच 'दादा!:भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा विजय; पटोले-पडोळे जोडीला मोठा धक्का

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब्राह्मणकर यांना ३०२ तर ईश्वरकर यांना १५२ मते मिळाली. या विजयामुळे भंडारा-गोंदियात भाजपचे नेते आमदार डॉ. परिणय फुके हेच ‘किंगमेकर’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

Read More

नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना…

Read More

चांदवडला 170 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहरात सत्कार समारंभाचे आयोजन

यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास व जिद्द बाळगून त्यास कठोर परिश्रमाची जोड देत सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर निश्चीत गाठता येते, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयातील सभागृहात आयोजीत तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी…

Read More

पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत‎

श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा पंढरीला निघाला…वेशीपर्यंत भक्तीचा सागर लोटला, असे भावजागृत करणारे दृश्य ही पायदळी वारी मार्गस्थ होताना दिसून आले. अकोला जिल्ह्यातील वेशीवर भक्तांनी या पायदळ वारीचे स्वागत करीत…

Read More

मंगळवेढ्यात बायपासवर मोठे खड्डे, रस्त्याकडेचे नागरिक धुळीने बेजार:रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला, नागरिकांनी व्यक्त केला संताप‎

मंगळवेढा बायपासवरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे कसरत असल्याचे चालक बोलत आहेत. रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक धुळीने बेजार झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी भाजप शहराध्यक्षांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनावर काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत…

Read More

मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत

मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, लोकनृत्य आणि कथ्थकच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केले. या सादरीकरणाबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक…

Read More

विधान परिषद निवडणूक:आज सकाळी दहाला निकाल

विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतांच्या मोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या दोन तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियोजन भवनात होणाऱ्या या मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. संपूर्ण मतमोजणी केवळ दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे….

Read More

अहिल्यानगरमध्ये 2 हजारांवर नागरिकांच्या उपस्थितीत शहरात योग दिन साजरा:सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये रंगला योगमय सोहळा

जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, विविध योग संस्था आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर हा योगमय सोहळा पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More