Headlines

तिवसात 50 वर्षांच्या कडुनिंबाच्या झाडाची विनापरवानगी कत्तल:निसर्गप्रेमींकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

तिवसा शहरातील सातरगाव मार्गावर सुमारे पन्नास वर्षे जुन्या कडुनिंबाच्या झाडाची विनापरवानगी कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. हे हिरवेगार कडुनिंबाचे झाड तिवसा नगरपंचायत हद्दीत होते. परिसरातील नागरिकांसाठी ते सावली आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार होते. रात्रीच्या वेळी या झाडाची कत्तल करून…

Read More

मेळघाटातील बोरधा ग्रामस्थांनी स्वतः खोदली बोअरवेल:110 कुटुंबांनी अडीच लाख रुपये जमा करून पाणी समस्या सोडवली

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी मिळत नसल्याने, गावातील ११० कुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा करून गावात बोअरवेल खोदली. यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये गोळा करण्यात आले. बोरधा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून लक्ष दिले जात…

Read More

अमरावती विधान परिषद निकाल:सोमवारी सकाळी 8 पासून मतमोजणी, 10 पर्यंत निकाल अपेक्षित

अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचा निकाल आज, सोमवार, २२ जून रोजी जाहीर होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक यंत्रणेनुसार, जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयाचा कोटा पूर्ण केला, तर सकाळी १० वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास…

Read More

श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मास कार्यक्रमांची सांगता:यज्ञाने समारोप, पाऊस व शांततेसाठी प्रार्थना; महिनाभर विविध उपक्रम

सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभराच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची नुकतीच यज्ञाने सांगता झाली. या समारोपावेळी सर्वदूर चांगला पाऊस पडावा आणि जगात शांतता नांदावी, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे. या उपक्रमांचे संयोजन ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल आणि डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी केले. यावेळी विश्वस्त…

Read More

सीओईपी स्थापना दिनी लिला पूनावाला::संशोधन-विकासावर भर द्या, प्राध्यापकांना पुरेसा वेळ द्या

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पद्मश्री लिला पूनावाला यांनी संशोधन आणि विकासावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. पारंपारिक शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडून या क्षेत्रात लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हा स्थापना दिन सोहळा पार पडला. यावेळी लिला पूनावाला फाऊंडेशनच्या संस्थापक आणि सीओईपीच्या माजी…

Read More

टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात भीषण अपघात, पती गंभीर जखमी; चालक अटक

पुण्यात हडपसर भागात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. नेहा सुमीत उपाध्ये (वय २७, रा. सनराईज हाऊसिंग सोसायटी, सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार…

Read More

महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचा चेहरा हरपला!:ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे निधन, राज्यसभेची संधी धुडकावत किंगमेकरच्या भूमिकेत

महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील एक अभ्यासू, लढाऊ आणि निःस्वार्थी विचारवंत अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लक्षावधी कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक बुलंद आवाज शांत झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ लातूर जिल्ह्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय…

Read More

गडचिरोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन:700 हून अधिक पोलिस अधिकारी- जवानांचा सहभाग

गडचिरोली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालय येथे सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात 700 हून अधिक पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त, सशक्त आणि मन प्रफुल्लित ठेवण्याच्या उद्देशाने…

Read More

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray At Matoshri; Sanjay Raut Present

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपला थेट त्यांच्याच ‘क्रॉस व्होटिंग’च्या खेळात मात देऊन 5 जागा जिंकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी (20 जून) ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मह . डी. के. शिवकुमार यांचे ठाकरे कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शाल देऊन त्यांचे आदरातिथ्य केले. या…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली:मुंबईसह उपनगरात वरुण राजाचे आगमन, पुणे-ठाण्याला 'यलो अलर्ट'; उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे ढग

संपूर्ण राज्याला असलेली मान्सूनची प्रतिक्षा आज अखेर संपली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली असून अनेक भागांत काळ्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतील हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून, गेले अनेक दिवस असह्य उकाड्याने आणि दमट वातावरणाने त्रस्त…

Read More