Headlines

खाद्यतेल अभियानात सोयाबीन, भुईमूगची निवड:कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा- जिल्हाधिकारी‎

पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले….

Read More

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:प्रकृती खालावल्याने राज्यभरात संताप, महामार्गावर टायर जाळले

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, तुपकरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर झाला आहे….

Read More

कुटुंबासह उपोषणाची घेतली धास्ती:तहसीलदार पोहोचले पाहणीसाठी, रामटेके यांचे उपोषण मागे‎

मोर्शी तालुक्यातील खोपडा शेत शिवारातील पाणंद रस्त्यामधून नाली काढून सिमेंट पाईप टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. त्यासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी आज, मंगळवारी १६ जूनपासून सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची धास्ती घेऊन तहसीलदार सागर ढवळे यांनी आज मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली. परिणामी रामटेके यांनी…

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे यश:स्ट्रॉबेरी प्लेटच्या धर्तीवर "ट्रायकोडर्मा' कंटेनरला मिळाले भारतीय पेटंट!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा रोगशास्त्रज्ञ डॉ. पोपट खंडागळे यांनी स्ट्रॉबेरीच्या प्लेटप्रमाणे जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’ तयार करण्यासाठी एक विशेष रचना प्रारूप विकसित…

Read More

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश…

Read More

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा तास रखडल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेपासून मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता. रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे…

Read More

लासूर स्टेशन बसस्थानकाची चौकशी समितीकडून पाहणी:तक्रारीची दखल, आठवड्याभरात अहवाल सादर होणार‎

लासूर स्टेशन येथील बसस्थानकाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारीवरून मंगळवारी चौकशी समितीने प्रत्यक्ष बसस्थानक स्थळाची पाहणी केली. समितीत अहिल्यानगर येथील अभियंता मंजुळे तसेच कनिष्ठ अभियंता दरेकर यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ, पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी बांधकामातील विविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. बसस्थानकाच्या इमारतीतील काही कॉलममध्ये भेगा पडल्याचे तसेच शेडसाठी…

Read More

शरणापूरला रंगणार ‘हिंदकेसरी बैलगाडा शर्यत’:देशपातळीवरील स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच केले आयोजन‎

दौलताबाद बैलगाडा शर्यतीचे संभाजीनगरला पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले असून, शरणापूर येथील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी भारतातील मानाचे पहिले ‘हिंदकेसरी मैदान’ सज्ज झाले आहे. येत्या रविवारी (२१ जून) सकाळी ७ वाजेपासून या भव्य हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडा शर्यत म्हटली की पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आंबेगावचा घाट किंवा मुंबईची बिनजोड शर्यत आठवते. मात्र, काही महिन्यांपूर्वी…

Read More

सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर कारचे टायर फुटून गाडी दुभाजकापलीकडे:अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी, 2 रुग्णवाहिका अडकल्या

सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर सिडकोकडून येणाऱ्या एका भरधाव कारचे टायर अचानक फुटल्याने अपघात झाला. गाडी अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडून चक्क पुलाच्या पलीकडच्या बाजूला गेली. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी (१७ जून) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सिडकोकडून भरधाव येणारी कार ( एमएच ४३ एएल ९९३९) सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर चढत होती….

Read More

फुटीचे ढग:6 खासदार भूमिगत, उद्धवसेना आशेवर, ठाकरे सेनेच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत तीनच खासदार, आज बैठक

उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार असल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विलीनीकरणासाठी पत्र पाठवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या पत्राला किंवा बंडाला संध्याकाळपर्यंत दुजोरा मिळालेला नसल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाने…

Read More