Headlines

पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलेचा अमानुष छळ करत मूत्र पाजले:भोंदूला अटक, मारहाण करत विजेचे शॉकही दिले

ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे. राधामोहन मिश्रा (५९, रा. माउली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियसजवळ, उबाळेनगर, पुणे) असे या भोंदूचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी…

Read More

स्मार्ट मीटरवरून शहर काँग्रेस आक्रमक:नागरिकांच्या इच्छेविरुद्ध बसवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महावितरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्मार्ट मीटर आणि वीज मीटर संदर्भातील विविध समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले. काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे की, नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया, नवीन मीटर मिळण्यास होणारा विलंब, खराब व बंद मीटर वेळेत न बदलणे, चुकीचे मीटर रीडिंग, वाढीव वीज…

Read More

जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर महिलांचे गर्भलिंग निदान:गर्भपात रॅकेटप्रकरणी महिला डॉक्टरला अटक; आतापर्यंत चौघांना बेड्या

पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी केडगाव चौफुला येथील प्रसिद्ध असलेल्या ‘पार्थ हॉस्पिटल’च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना अटक केली आहे. गर्भात मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, संबंधित गर्भवती महिलांना…

Read More

खत बुकिंग ॲपमुळे शेतकरी त्रस्त; तात्पुरती स्थगितीची मागणी:खासदार डॉ. कल्याण काळे, संदीपान भुमरे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या खत बुकिंग मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी आणि खत विक्रेते त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर या ॲपमुळे शेतकऱ्यांना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, ही प्रणाली चालू खरीप हंगाम संपेपर्यंत तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि…

Read More

कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

अमरावती येथे १७ जून रोजी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात तीव्र आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये आंदोलकांनी मंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. ‘सरकार हाय हाय’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी नंतर पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध नोंदवला. हे आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी…

Read More

'ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत!':ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिवसेना शिंदे गटाची सावध भूमिका

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरने खळबळ उडवली असून शिवसेना ठाकरे गटात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाले असून काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे पुरावे समोर आणले नाहीत….

Read More

सीईओ सत्यम गांधींकडून दर्यापूरमधील विकासकामांची तपासणी:आरोग्य, घरकुल, नरेगा, स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय आणि विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्याची सुरुवात येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीने झाली. परिसरातील अस्वच्छता पाहून सीईओ गांधी यांनी तीव्र नाराजी…

Read More

ऑपरेशन टायगर यशस्वी झालेय तर चेहरे दाखवा:आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोब, खासदार अरविंद सावंतांचा दावा

शिवसेनेतील ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम असून, ठाकरे गटाचे खासदारही यावर उघडपणे बोलणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावला आहे. तसेच ‘आता राडा होईल’ असा थेट इशारा राऊत यांनी फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दिला आहे. एकीकडे, अरविंद सावंत…

Read More

पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार:मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुणे-शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ, विकासकामांचे भूमिपूजन

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार असून, येथे ६ नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जातील आणि सध्याच्या ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येईल. पुण्याची मोठी लोकसंख्या लक्षात घेता येथे मेगा टर्मिनस उभारणीच्या…

Read More

एल निनोमुळे चारा टंचाईची शक्यता, पशुपालकांनी लक्ष द्यावे:पशुधन व दुग्धोत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन आवश्यक

जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. पशुपालकांना या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी…

Read More