Headlines

पुण्यामध्ये भोंदूबाबाने महिलेचा अमानुष छळ करत मूत्र पाजले:भोंदूला अटक, मारहाण करत विजेचे शॉकही दिले




ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेचा अमानुष छळ करत तिला स्वत:चे मूत्र पाजले. अनेकदा मारहाण करत विजेचा शॉक दिल्याचे समोर आले आहे. राधामोहन मिश्रा (५९, रा. माउली सदन, गट नं. १३४४/७, रेणुका पार्क, आरव ॲम्बियसजवळ, उबाळेनगर, पुणे) असे या भोंदूचे नाव आहे. तर त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (५८) या दोघांसह अन्य सहा महिलांविरोधात खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. महिला उच्चशिक्षित असून येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे आई-वडील डॉक्टर आहेत. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा महिलेचे वडील गेले होते. कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबीयांची भोंदूबाबा मिश्राशी ओळख झाली. त्या वेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे महिलेचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. भोंदूने महिलेवर गेल्या काही वर्षांत अनेकदा अत्याचार केले. दरम्यान, आरोपींना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *