‘ग्रामोद्यम’ योजनेमधूनदीड लाख तरुणांना संधी:भूमिहीन शेतमजूर व महिलांना थेट कर्जपुरवठा
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी शहरांची वाट धरावी लागू नये यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) ‘ग्रामोद्यम’ ही नवी राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. आगामी दोन वर्षांत देशभरातील तब्बल दीड लाख ग्रामीण तरुणांपर्यंत पोहोचून ४ हजार नवे सूक्ष्म उद्योग थेट बँकांच्या कर्जसुविधेशी जोडण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे. नाबार्डच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयात आयोजित…