पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून 15 वर्षाचा मुलगा ठार:एक महिला गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारात विज पडून एक १५ वर्षाचा मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी ता. २६ घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी येथील आनंद नागोराव जाधव (१५) व कमलबाई…