जि.प. बदल्यांचा तिढा मंत्रालयात; मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे:स्थगित केलेल्या बदल्या सुरू कराव्यात, कर्मचारी संघटना
जनगणनेमुळे स्थगित केलेल्या बदल्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना प्रदेश पदाधिकाऱ्यांमार्फत साकडे घालण्यात आले असून या मुद्याचा इतरही मंत्र्यांच्या दालनात पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान याच मागणीचे निवेदन राज्याचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हेमंतकुमार…