हवामान बदल अटळ; प्रत्येक थेंब जपा,शेतीचे नियोजन बदला- पंजाबराव डख:किनगाव राजा येथे व्याख्यान, शेतकऱ्यांना संघटित होण्याचे केले आवाहन
साखरखेर्डा पुढील दोन दशकांत हवामानातील अनिश्चितता वाढणार असून, पारंपरिक शेतीसोबत वैज्ञानिक नियोजन स्वीकारल्याशिवाय शेती टिकणार नाही. प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन, बदलत्या पावसाच्या स्वरूपानुसार पीकनियोजन आणि शेतकऱ्यांची संघटित ताकद हेच भविष्यातील शेतीचे आधारस्तंभ ठरणार आहेत, असा दूरदृष्टीचा संदेश हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला. लोकशिक्षण संस्थेचे वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार…