Headlines

नागपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या जागेचा निर्णय महिनाभरात:हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील वाढत्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पारडी परिसरात ‘नागपूर स्किल सेंटर’ उभारण्यात आले आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID), टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ…

Read More

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुलभ:महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक; मेट्रो, मोनोरेल आणि लोकल एका छताखाली

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी अखंड बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महालक्ष्मी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच मेट्रो-3, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडणारा देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबतची माहिती एमएमआरडीएने त्यांच्या सोशल मीडियावर…

Read More

Mumbai Local Train TC Controversy; CCTV Footage Denies Passenger Assault

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसले . सदर घटना २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मशीद बंदर स्थानकादरम्यान घडल्याचा दावा सचिन कुमार मौर्य या…

Read More

प्रति पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियान; हजारो किलो कचरा संकलित:दोन ट्रॅक्टर चपलांसह १००० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

आषाढी एकादशीनिमित्त येथील ‘प्रति पंढरपूर’ येथे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांच्या दर्शनानंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत अवघ्या तीन तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. एकादशीच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून…

Read More

100 वे साहित्य संमेलन व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल:कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा विश्वास; विद्यापीठात कार्यशाळा

100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला आहे. या संमेलनामुळे पुणे शहराची ‘पुस्तकांची नगरी’ ही ओळख अधिक दृढ होईल, असेही ते म्हणाले. मराठीचा प्रचार-प्रसार हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट असून, यामुळे मराठी भाषा…

Read More

विदुषी जया जोग यांचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा:मंगला गोडबोले म्हणाल्या- जगण्यातील मोकळ्या जागा भरण्याचा शोध महत्त्वाचा

पुणे येथे विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी ‘जगण्यातल्या आणि अनुभवांतल्या मोकळ्या जागा भरण्याचा शोध कायम राहावा,’ असे प्रतिपादन केले. कलाकाराला या शोधाचा सतत ध्यास असतो आणि जया जोग यांच्या मनातही तो कायम राहावा, अशी अपेक्षा गोडबोले यांनी व्यक्त केली. भारतीय विद्या भवन आणि…

Read More

डिलिव्हरी बॉयकडून पोलिसाला धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा:महिलेशी वाद घालताना मध्यस्थी करणाऱ्या हवालदाराला शिवीगाळ, धमकीही दिली

पुण्यात एका डिलिव्हरी बॉयने पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ जुलै रोजी शनिवारवाडा परिसरात घडली. या प्रकरणी पोलीस हवालदार वैभव येसादे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर्यन अजित सावंत (वय १९, रा. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, आकुर्डी)…

Read More

भाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' उपक्रमाचे आयोजन:केंद्र सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील युवा पिढीच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मात्र, विरोधी पक्षांकडे कोणतीही ठोस दृष्टी नसल्याने ते आंदोलने, अपप्रचार आणि ‘फेक नॅरेटिव्ह’च्या आडून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या युवककेंद्रित धोरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सत्य…

Read More

'मी महाराष्ट्रातच राहणार!':मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?

शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे, फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. गेल्या महिन्याभरापासून, विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून आणि सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यतांमुळे या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. मात्र, या सर्व…

Read More

वैद्यकिय महाविद्यालयात मोफतचे 3 अन खाजगी MRIचे रुग्ण वाढले कसे?:सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल, आरोग्य विभागाने चौकशी करण्याची मागणी

हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मोफत रुग्णांचे दररोज केवळ दोन ते तीनच एमआरआय होत असतांना खाजगी रुग्णालयातून आलेल्या १५ ते १६ रुग्णांचे एमआरआय कसे होतात असा सवाल उपस्थित करण्यात आला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांनी केली आहे. हिंगोली येथे एमआरआय नसल्यामुळे रुग्णांना नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत होते….

Read More