Headlines

भातकुली पंचायत समितीला मिळणार दुसरे दालन‎:गळतीयुक्त इमारतीचा सीइओंनाही आला अनुभव, नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठीची अमरावतीत असलेली पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच आपला साज बदलणार आहे. या इमारतीचे बांधकाम फार जुने झाले असल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या गळकी इमारत म्हणून तिचा उल्लेख केला जात असून, पाणी गळण्याचा अनुभव सीईओ सत्यम गांधी यांनाही आला आहे. त्यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला अधिक गती आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

कौंडण्यपुरात दर्शनासाठी 4 तास प्रतीक्षा‎:विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 20 हजारांहून अधिक भाविक रांगेत‎

अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या, तर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने कौंडण्यपूरचे वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू पांडुरंगाच्या कृपेची अनुभूती होती आणि प्रत्येक भाविकाच्या हृदयात विठू-रखुमाईच्या दर्शनाची अखंड तळमळ दाटून आली होती. सुमारे चार तासांची दर्शन प्रतीक्षासुद्धा भक्तीच्या ओढीपुढे कमी वाटत होती. विठूनामाचा अखंड जयघोष, ओठांवरील अभंग आणि डोळ्यांत दाटलेली दर्शनाची…

Read More

भगवानगडावर भाविकांसाठी शंभर क्विंटल साबुदाणा फराळ:धाकट्या अलंकापुरीत आषाढीला भक्तीचा महासागर, भाविकांची गर्दी

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त धाकटी अलंकापुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र भगवानगडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर हरिनाम, भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या वारकऱ्यांसाठी भगवानगड हे श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते….

Read More

“धाकटी पंढरी’त रंगला नयनरम्य रिंगण सोहळा:पैठणहून आणलेल्या गंगाजलाने श्रींना अभिषेक; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतले दर्शन‎

. तालुक्यातील श्रीक्षेत्र वरूर (धाकटी पंढरी) येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. चारशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्वयंभू देवस्थानात दिवसभर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्रीक्षेत्र पैठण येथून कावडीद्वारे आणलेल्या पवित्र जलाने श्रींचा गंगाजलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर लघुरुद्राभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, हरिनामाच्या…

Read More

50 युवकांचा सहभाग:बोरगाव अर्ज येथून शिर्डी पायी दिंडीचे उत्साहात झाले प्रस्थान, 29 जुलै रोजी शिर्डीला पोहोचणार‎

फुलंब्री बोरगाव अर्ज येथून साईभक्तांच्या शिर्डी पायी दिंडीचे गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. गेल्या १६ वर्षांची परंपरा जपत बोरगाव अर्ज येथील तरुणांनी यंदाही या पायी वारीचे आयोजन केले आहे. सकाळी आठ वाजता स्थानिक साई मंदिरात साईबाबांचे भावपूर्ण पूजन व महाआरती करून दिंडीचा शुभारंभ झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘साईनाथ महाराज की जय’च्या जयघोषात गावातून…

Read More

सप्तशृंगी गडावरील पाणीप्रश्न सुटला:भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान, आज हाेणार जलपूजन‎

सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा होणारा भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सप्तशृंगी गडाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रविवारी (दि.२६) प्रशासक आणि आणि माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या सप्तशृंग गडावर असलेला भवानी पाझर तलाव दरवर्षी संपूर्ण क्षमतेने भरतो. डोंगराळ भागात आणि…

Read More

वारकरी संप्रदायाने माणसातील ईश्वराला जागे केले- अब्दुल जावेद:कन्नड शहरात आषाढी एकादशीनिमित्त राबवले विविध उपक्रम‎

वारकरी संप्रदायाने जाती-धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणसातील ईश्वराला जागे केले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि सलोखा हाच आषाढी एकादशीचा खरा संदेश आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अब्दुल जावेद यांनी केले. आषाढी एकादशीनिमित्त पिशोर नाका येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्नेहमिलन, वारकऱ्यांचे स्वागत व खिचडी वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती डॉ….

Read More

नाशिक-पालघरला सकाळी तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सायंकाळी भूकंपाचे धक्के:कळमनुरी तालुक्यात 1, नाशिकच्या सुरगण्यात 4, दिंडोरीत 2 वेळा हादरे

हिंगोली, नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकच्या सुरगणा तालुक्यात ४, दिंडोरीत २ तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात शनिवारी सकाळी हादरे बसले. त्यानंतर सुमारे १० तासांनी हिंगोली िजल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शनिवारी सायंकाळ . हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याची मालिका सुरू होती. अचानक जमिनीतून गडगडाट होऊन मोठा आवाज होत होता. त्यानंतर…

Read More

नियोजन:भूसंपादन होण्यापूर्वी ऑरिकच्या 8 हजार एकरांपैकी 4 हजार एकर बुक, भूसंपादनासाठी 2500 कोटी वापरणार

ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन घेऊन उद्योग उभारण्यासाठी बिडकीन परिसरातील गावांमधील जमिनींना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. नव्याने होत असलेल्या ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमीन संपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० टक्के जमिनीची नोंदणी उद्योजकांनी केली आहे. या विस्तार योजनेसाठी ऑरिकच्या स्वनिधीतील तब्बल २५०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनाकरिता वापरला जाणार असून येत्या वर्षभरात…

Read More

राज्यात पक्क्या नोकऱ्यांऐवजी चहा अन् पानटपऱ्यांवर गुजराण:एनएसओच्या अहवालातून वास्तव आले समोर, सुशिक्षित बेरोजगार मजबुरीच्या गर्तेत

महाराष्ट्रात रोजगाराचे आकडे वाढल्याचे ढोल सरकारकडून पिटले जातात. पण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात एनएसओच्या अहवालाने या दाव्यांचे धिंडवडे काढले आहेत. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचा वार्षिक अहवाल-२०२५ नुसार, राज्यातील तरुणांच्या उपजीविकेचे पर्या . देशात अशा प्रकारच्या ७.९२ कोटी तर महाराष्ट्रात ६५.६५ लाख असंघटित आस्थापना आहेत. यात अनुक्रमे देशात १२.८१ कोटी तर राज्यात १.१७ कोटी लोक येथे काम…

Read More