Headlines

एका झुरळाने हुकूमशाहाला झुकवले!:तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यावरून अस्वस्थ असलेल्या देशाला तरुणांच्या ताकदीने भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्ते अभिजीत दीपके आणि देशभरातील तरुणांचे कौतुक केले. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित विधानाचा आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. “एका झुरळाने…

Read More

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली:'अभ्यासू, संवेदनशील आणि निडर आवाज हरपला' – पाटील

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पाटील यांनी डॉ. सप्तर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यांनी सप्तर्षी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. सप्तर्षी यांचे काही दिवसांपूर्वी निधन…

Read More

पुणे पोलिसांना मोठे यश:88 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी UAE मधून अटकेत

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ८८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयातून ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २० ऑगस्ट २०२३…

Read More

'ते पोलिस काका वाटतात तितके वाईट नाहीत':'खिशात पावडर' टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या बचावासाठी तरुण सरसावला

“खिशात 50 ग्रॅम पावडर टाकून कारवाई करेन” अशी धमकी देणाऱ्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या घटनेवेळी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या तीन तरुणांपैकी एकाने पुढे येत या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणली असून, “ते पोलिस काका वाटतात…

Read More

नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात महापूजा:आषाढी एकादशीनिमित्त 'महिला भवन' उभारण्याचा संकल्प, सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे…

Read More

भक्तीच्या महासागरात न्हाली अवघी पंढरी…:भजन-कीर्तन करत विठूभक्त पंढरपुरात येतात… त्यामुळे आषाढीचा सोहळा कीर्तनाच्या स्वरूपात सांगणारा हा दिव्य मराठीचा प्रयोग

जय जय राम कृष्ण हरी। काय सांगू तुम्हाला माउली, या पंढरपूरनगरीत अतिशय प्रसन्न वातावरण आहे बरं. सूर्यदेवाची कोवळी किरणं आसमंताला प्रकाशून टाकताहेत अन् भक्तीच्या महासागरात अवघी पंढरी न्हालीय. पहाटेच्या उत्तरप्रहरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची मुख्य शासकीय महापूजाही झालीय. आषाढी एकादशीच्या महापर्वाला चहूकडे अवघा रंग एक झालाय. आणि पाहा,…

Read More

बसस्थानकात नयनरम्य रिंगण सोहळा:शालेय विद्यार्थ्यांच्या बालदिंडीने वेधले सर्वांचे लक्ष

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, नेवासा फाटा येथे मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिंडी सोहळ्याचा मार्ग नेवासे बसस्थानक ते श्री ज्ञानेश्वर…

Read More

'पेपरफुटी'ची तुलना थेट 'आंबा चोरी'शी!:चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान, हर्षवर्धन सपकाळ, अमित ठाकरेंचा संताप; नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पेपरफुटी’ची तुलना थेट ‘आंबा चोरी’शी केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक…

Read More

दमदार पावसाची प्रतीक्षा:मागील नऊ दिवसांत मराठवाड्यातील धरणसाठ्यात केवळ 0.18 टक्के वाढ

मराठवाड्यात मागील आठवडाभरात झालेल्या पावसानंतरही ४४ धरणे व मोठ्या प्रकल्पांमधील ३१.७० टक्के पाणीसाठा कायम आहे. मागील ९ दिवसांत या धरणांमध्ये केवळ ०.१८ टक्के पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी आणि इसापूर या धरणांचा साठा वाढला, तर ६ धरणांचा साठा १ ते २ टक्क्यांनी घटला आहे. मराठवाड्यात जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा येऊनही दमदार पाऊस नसल्याने भविष्यात पाणी प्रश्‍न…

Read More

दिलासादायक:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 44,648 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ जून २०२६ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या शासन निर्णयाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील तब्बल ४४,६४८ पात्र शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती आणि अर्थसहाय्याचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र, जो शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाही त्याला शासन स्तरावरून कमी करण्यात येणार आहे. जिल्हा…

Read More