Headlines

श्रावण मेळ्याच्या आयोजनातून‎ दिव्यांगांना मिळणार रोजगार‎:अग्रसेन भवनात आज, उद्या मेळाव्याचे आयोजन‎

अग्रवाल जागृती महिला मंडळ, अग्रवाल सखी मंच आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जुलै रोजी अग्रसेन भवनात श्रावण मेळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या मेळ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मेळ्यात दिव्यांग सोशल फाउंडेशनचे विशेष ‘कलादालन’अकोलेकरांसा ठी उपलब्ध असणार आहे. यात दिव्यांगांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक…

Read More

अवघा रंग एक झाला!:राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तीमय उत्साह, पंढरीत भाविकांचा महासागर

आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासूनच राज्यभरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांनी ‘राज्यात चांगला पाऊस पडून पीक बहरू दे आणि महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,’ अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी केली. राज्याच्या इतर भागांतही आषाढीचा मोठा उत्साह दिसून येत असून विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी…

Read More

कौंडण्यपुरात आज भाविकांची गर्दी:पहाटे 6 वाजता महापूजा : गर्दी लक्षात घेता बंदोबस्तात केली वाढ

माता रुक्मिणीचे माहेर असलेले कौंडण्यपूर हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) पहाटे ६ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार असून, दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी कौंडण्यपुरात दाखल होणार आहे. दरम्यान या सोहळ्यामुळे अवघ्या कौंडण्यपूरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बसची तत्काळ व्यवस्था कौंडण्यपुरसाठी…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना:हिंगोलीतील 673 गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ६७३ गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी ता २४ जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती…

Read More

विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन वसुधा' अभियान:अकोल्याला हरित बनवण्याचा संकल्प

विक्रमी ४७ अंश सेल्सिअस तापमानामुळे अकोल्याची ओळख देशातील अतिउष्ण शहरांमध्ये झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. दरवर्षी लाखो झाडे लावली जातात; मात्र त्यातील मोठा हिस्सा काही महिन्यांतच नष्ट होतो. त्यामुळे केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष जगवणे हीच काळाची खरी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर जेसीआय अकोला सिटीच्या…

Read More

मानवी साखळी अन् मार्च काढून दिल्लीतील लाठीमाराचा निषेध:केंद्रीय शिक्षणमंत्री‎ धर्मेंद्र प्रधान यांच्या‎राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन‎करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या‎पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे‎पडसाद शुक्रवारी अहिल्यानगरात उमटले. ‎‎शहरातील वर्दळीच्या दिल्लीगेट परिसरात ‎‎विद्यार्थी आणि विविध सामाजिक‎संघटनांचे कार्यकर्ते एकवटले. वाहतुकीला ‎‎अडथळा होऊ नये, याची काळजी घेत ‎‎विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला मानवी ‎‎साखळी तयार करत शांततेच्या मार्गाने‎निषेध नोंदवला. हातात मागण्यांचे फलक ‎‎आणि घोषणांची पोस्टर घेऊन उभ्या‎असलेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगेने‎नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.‎ दिल्लीत जंतर-मंतर…

Read More

ओंकारनगर'चा दिंडी सोहळा:लेझीमचा ठेका अन् पर्यावरणाचा मेळा, केडगाव परिसरात रिंगण सोहळा, फुगडीचा उत्सा

मनपाच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून केडगाव परिसरात ‘बालदिंडी’ काढली. भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या या बालदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देऊन उपस्थितांची मने जिंकली. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात निघालेल्या या बालदिंडीचे ठिकठिकाणी नागरिक आणि भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. विठ्ठलाच्या भक्तीगीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या…

Read More

इगतपुरीत ७२ तासांत ६१५ मिमी:३० दिवसांचा पाऊस तीनच दिवसांत; भावली, भाम धरणे ओव्हरफ्लो

इगतपुरी तालुक्यात ७२ तासांत तब्बल ६१५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, अवघ्या तीन दिवसांत महिनाभराचा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, पूर, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. पावसामुळे भावली, भाम आणि दारणा धरणे ओव्हरफ्लो झाली असून, दारणा धरणातून विक्रमी १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग…

Read More

चांदवडला 24 शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल्सची चोरी:रायपूर आणि भडाणे फाटा परिसरातील प्रकार

चांदवड तालुक्यातील रायपूर, भडाणे फाटा आणि समिट स्टेशन परिसरात दि. १९ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल २४ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारी व सोलर पंपांच्या केबल्स‌्ची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे. घटनेनंतर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र,…

Read More

प्राणघातक हल्ला:सिल्लोड शहरात घरात घुसून जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

सिल्लोड कौटुंबिक वादातून व संशयाच्या भरात सासरच्या घरात घुसून जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या हल्ल्यात पत्नी व सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयभवानीनगर येथील समरीन खालेक पटेल (२२) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील आरेफ सत्तार पटेल…

Read More