Headlines

पार्थ, कायनात यांचा विवाह पुढील वर्षी 27 फेब्रुवारीला:धार्मिक प्रथांबाबत शंकराचार्यांकडून मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार असून त्यांचा साखरपुडा २९ जुलै २०२६ रोजी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट…

Read More

फोटो व्हायरलची धमकी देत महिलेचे घाटीतून अपहरण:पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अत्याचार, संभाजीनगरातील घटना; बदनापूरातील पीडिता

मावस भावाला भेटण्यासाठी घाटीत आलेल्या ३५ वर्षांच्या ऊसतोड मजूर महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. इन्स्टाग्रामवरील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन हे अपहरण करण्यात आले. १५ ते १७ जुलै दरम्यान नेवासा येथे हा प्रकार घडला. प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजू म्हसू माळी (२७, रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे….

Read More

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या माण-बालेवाडी टप्प्याला CMRS ची मंजुरी:सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी, प्रवासी सेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत ‘एटीपी’ मोडवर…

Read More

पवना धरण परिसरातील शेतकरी राजू शेट्टींना भेटले:बंद पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी चर्चा

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची पुणे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. ९ ऑगस्ट २०११ रोजी मावळ तालुक्यात याच पाईपलाईन योजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या घटनेत कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि श्यामराव तुपे…

Read More

पुन्हा पेपर फुटणार नाही, याची हमी कोण देणार?:विद्यार्थ्यांचा उद्विग्न सवाल; कमी मार्क आल्याने विद्यार्थिनीच्या वडिलांना हार्ट अटॅक

‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची धग आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही आज विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आक्रोश व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरमध्ये दुसऱ्यांदा नीटची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपला संताप व्यक्त करत, “पुन्हा 2027 मध्ये नीटचा…

Read More

पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी:बारामती येथे होणार; शंकराचार्यांकडून धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन

खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे. त्यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून, त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आई किंवा…

Read More

Chitra Wagh Accuses Anil Deshmukh of Molestation; Mumbai Political Row

मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ‘सीजेपी’ (CJP) आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर दुसऱ्या . चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला…

Read More

सुपर अल निनोमुळे शेतकरी पुन्हा संकटात:शेतकरी अन् मजुरांना वेतन आयोगाच्या धर्तीवर थेट मदत द्या, विजय जावंधिया यांची मागणी

वातावरणातील तीव्र बदल आणि ‘सुपर अल निनो’मुळे यंदा जून महिन्यात पावसाने मारलेल्या ओढीमुळे देशातील शेती आणि शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याने जूनमध्ये 45 टक्क्यांपेक्षा कमी झालेला पाऊस…

Read More

नाशिकमध्ये पुराचा हाहाकार:'दुतोंड्या मारुती' संपूर्ण पाण्याखाली; गंगापूर धरणातून 14,407 क्यूसेकने विसर्ग सुरू

नाशिक शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. परिणामी, रामकुंड परिसरातील ऐतिहासिक ‘दुतोंड्या मारुती’ची मूर्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून पुराचे पाणी शहरातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये शिरले आहे….

Read More

'नीट'सारख्या गंभीर विषयावर राजकारण नको:संसदेतील गोंधळावर खासदार नरेश म्हस्के यांचा विरोधकांवर हल्लाबोल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘नीट’ परीक्षेसारख्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषयावर राजकारण करण्याऐवजी संसदेत विधायक चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. विरोधक सातत्याने गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज…

Read More