Headlines

गोरे होण्याच्या नादात मृत्यूच्या दारात;क्रीममध्ये पारा 15,000 पटीने जास्त:दोन हजारांची क्रीम वापरणाऱ्या पुण्याच्या ३ तरुणांना गंभीर आजार

चेहरा गोरा करण्याच्या नादात पुण्याच्या शिक्रापूर परिसरातील ३ तरुणांचे आयुष्य थेट मृत्यूच्या दारात पोहोचले. फेस ब्राइटनिंग नाइट क्रीममुळे त्यांना आजारांनी ग्रासले आहे. त्यांनी चेहऱ्यावर लावलेल्या क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यात १५,०९८.६९ पीपीएम एवढा घातक पारा असल्याचे निष्पन्न झाले. एफडीएच्या नियमानुसार क्रीममध्ये पारा केवळ १ पीपीएम मिसळता येईल. मात्र क्रीममध्ये प्रमाणापेक्षा पारा १५००० पट जास्त…

Read More

एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग:श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दिंडी उत्साहात संपन्न

श्री माहेश्वरी मंडळ, बन्सीलाल नगर प्रभागातर्फे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने आयोजित “एक पाऊल विठ्ठलाकडे… परिवार संग… विठ्ठल रंग!” या विठ्ठल दिंडीचे आयोजन अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या दिंडीत सुमारे ५०० ते ७०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भगवान श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, अभंग, भजन, टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. महिला, युवक,…

Read More

अंबानगरीत दिवसभर विठूनामाचा गजर, मंदिरे हाऊसफुल्ल:पटवीपुऱ्यातील प्राचीन मंदिरात भाविकांची लांबच लांब रांग

आषाढी एकादशीनिमित्त अमरावती शहर आणि जिल्ह्यात शनिवारी विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा अखंड गजर आणि टाळ-मृदंगाचा नाद घुमला. भाविकांच्या अलोट उत्साहाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. पटवीपुरा-बुधवारा येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विठूरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत…

Read More

शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी जिल्हा काँग्रेसची अमरावतीत निदर्शने:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने आज, शनिवार, २५ जुलै रोजी निदर्शने केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता…

Read More

Chandur Railway PMAY Housing Grant Distribution; Mayor Priyanka Vishwakarma

अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी. चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा . या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४०…

Read More

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्‍टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्‍टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून…

Read More

CM Devendra Fadnavis On Dharmendra Pradhan Resignation| CJP Protest

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “धर्मेंद्र प्रधानांनी व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा दिला. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठ . नीट पेपरफुटी प्रकरणी धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते. आज दुपारी धर्मेंद्र प्रधान…

Read More

महावितरणचा जागर:पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये 'स्मार्ट मीटर'बाबत व्यापक जनजागृती; ग्राहकांच्या शंकांचे निरसन

स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्याचे प्रत्यक्ष फायदे सांगण्यासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे शनिवारी (25 जुलै) पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंढरपूर वारीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. “स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून…

Read More

संभाजीनगर मनपाचा "स्वच्छतेची वारी" उपक्रम:बाबा पेट्रोल पंप ते छोटे पंढरपूर मार्गावर दिंडी, 200 हून अधिक कर्मचारी सहभागी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‘स्वच्छतेची वारी… विठुरायाच्या दारी’ हा अभिनव उपक्रम आज उत्साहात पार पडला. छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासोबतच जनमानसात स्वच्छतेचा संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. महावीर चौकातून सकाळी १० वाजता महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते स्वच्छता दिंडीला प्रारंभ झाला. यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल…

Read More

यशासाठी शिस्त, जिद्द आणि सातत्य महत्त्वाचे:ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने साधला विद्यार्थ्यांशी संवाद

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी शनिवारी अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसी स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचे अध्यक्ष सुजय जयराज यांनी या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’चे सूत्रसंचालन केले. आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव सांगताना सायना नेहवाल यांनी शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. यशाच्या मार्गावर अपयश अपरिहार्य असले, तरी…

Read More