एसीबीचा 1.75 कोटींचा गुप्त निधी मुख्यालयातच रोखला:कॅगचे गंभीर ताशेरे; 22 अधिकारी 5 वर्षांहून अधिक काळ ठाण मांडून
भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरप्रकार सुरू असल्याचे महालेखापाल (कॅग) यांच्या अहवालातून समोर आले आहे. गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आलेला 1.75 कोटी रुपयांचा ‘गुप्त निधी’ विभागीय कार्यालयांपर्यंत पोहोचू न देता मुख्यालयातच रोखून धरण्यात आला आहे. तसेच, 22 वरिष्ठ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच…