Headlines

सप्तशृंगी गडावरील पाणीप्रश्न सुटला:भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो; नागरिकांमध्ये समाधान, आज हाेणार जलपूजन‎




सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा होणारा भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे सप्तशृंगी गडाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, रविवारी (दि.२६) प्रशासक आणि आणि माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे. तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या सप्तशृंग गडावर असलेला भवानी पाझर तलाव दरवर्षी संपूर्ण क्षमतेने भरतो. डोंगराळ भागात आणि तीव्र उतारावर असलेला तलाव पाझरून पाणी हळूहळू कमी व्हायचे आणि ऐन उन्हाळ्यात तलाव तळ गाठायचा. यामुळे उन्हाळ्यात गडाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा सामना करावा लागायचा. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद व मंत्रालयातून विशेष निधी मंजूर करून घेऊन या तलावाची गळती थांविण्यासाठीचे काम केले असून, या कामामुळे ८० ते ९० टक्के तलावाची गळती थांबली आहे. भवानी पाझर तलाव भरल्यामुळे आनंदित झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी रविवारी सकाळी १० वाजता जलपूजन कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे. लवकरच भवानी पाझर तलाव जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक रमेश पवार, माजी उपसरपंच संदीप बेनके, सदस्य राजेश गवळी यांनी दिली. तलाव संपूर्ण भरला आहे. तसेच ट्रस्ट व ग्रामपंचायतीने गडावरील १८ जलकुंड आगामी नवरात्रोत्सवासाठी स्वच्छ करायचे नियोजन केले आहे. यामुळे सप्तशृंगी गडावर आगामी वर्षभराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे उन्हाळ्यातही या माध्यमातून पाणी उपलब्ध होणार असून, सप्तशृंग गडावरील पाणीप्रश्न सुटला असल्याचे नागरिक सांगतात. यामुळे पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *