Headlines

वनोलीत 586 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ:6 हजार नागरिकांची उपस्थिती, रक्तदान शिबिर व विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी‎




येवला एरंडगाव येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून ३ हजार ११ लाभ व सेवांचे वितरण करण्यात आले. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशन कार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, पुरवठा उपायुक्त प्रशांत काळे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आदींसह यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. मंत्री भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने शासनाने हे अभियान सुरू केले असून, विविध विभागांच्या योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असून, आवश्यक सेवा तातडीने मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही कार्यालयापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांच्या दारी पोहोचली पाहिजे. महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध विभाग एकाच व्यासपीठावर आल्याने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, विविध सेवा व योजनांचा लाभ तत्काळ मिळत आहे. या अभियानात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून अधिकाधिक पात्र नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी प्रास्ताविकातून महसूल विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. समाधान शिबिरात कांदा लागवड मशिनचे वितरण करताना आमदार दिलीप बोरसे व उपस्थित पदाधिकारी. प्रतिनिधी | सटाणा महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत बागलाण तालुक्यातील वनोली येथे बुधवारी आयोजित महाशिबिरात ५८६ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. शिबिराला सुमारे सहा हजार नागरिकांनी उपस्थिती लावत प्रशासनाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वनोली येथील साई श्रद्धा मंगल कार्यालय परिसरात झालेल्या महाशिबिराची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश डिजिटल स्क्रीनद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी महसूल अभियानामुळे शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असून, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निवारणालाही गती मिळत असल्याचे सांगितले. महाशिबिरात रक्तदान शिबिरासह विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. तालुका कृषी विभागाने १५० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला. महावितरणमार्फत सौर कृषी पंप व रूफटॉप सोलर योजनेंतर्गत २१३ लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. भूमी अभिलेख विभागाने १० बिनशेती सनदांचे वितरण केले, तर पुरवठा विभागाने १०० नवीन रेशनकार्डधारकांना लाभ दिला. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ११३ नवीन लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे देण्यात आली. याशिवाय शिक्षण, पंचायत समिती, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, महिला बचत गट आदी विभागांमार्फत सुमारे दोन हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील, माजी पोलिस उपायुक्त नितीन ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे, प्रवीण पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, उमेद अभियानातील महिला, सरपंच, पोलिस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने पारंपरिक कागदी रेशन कार्डाऐवजी क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला असून, या डिजिटल कार्डमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व वेगवान होणार आहे. बोगस लाभार्थ्यांना आळा बसण्याबरोबरच कार्ड खराब होणे किंवा हरवण्याच्या समस्याही दूर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्मार्ट रेशन कार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *