Headlines

सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात:ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

राज्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना, “सरकारविरोधात एखादा मुद्दा मिळाला की विरोधी पक्ष त्याचा फायदा घेतो. तेच त्यांचे काम असते,” असे म्हणत विरोधकांच्या भूमिकेवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या आंदोलनाबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, “सरकारच्या…

Read More

विद्यार्थी आंदोलनात देशविरोधी घोषणा का?:देशहिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत, त्यांनी आपल्या उंचीनुसार बोलावले – नीतेश राणे

राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत,” अशी टीका केली. नीट परीक्षा आणि त्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर आरोप करत केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा केला. ‘देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान कटिबद्ध’ नीतेश राणे म्हणाले…

Read More

मंत्री चंद्रकांत पाटलांकडून SIR मोहिमेला गती:बीएलओंसमवेत कोथरुडमध्ये घराघरांत जाऊन मतदारांशी साधला संवाद

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एसआयआर (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासमवेत कोथरुडमधील घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून एसआयआर गणना फॉर्म स्वीकारण्यात आले आणि मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली. या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले….

Read More

पुण्याच्या अनिका दुबेची कॅनडामध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड:जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

पुण्यातील १६ वर्षीय स्क्वॉशपटू अनिका दुबे हिची कॅनडामध्ये होणाऱ्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २० ते ३१ जुलैदरम्यान नायगरा-ऑन-द-लेक येथे होणाऱ्या या स्पर्धेत अनिका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या ३३व्या आशियाई ज्युनियर वैयक्तिक स्पर्धेत तिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले होते. अनिका ही तीन वेळा राष्ट्रीय…

Read More

Sunetra Pawar Unveils Ajit Pawar Statue & Inaugurates Exhibition

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाट . नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीय, जय पवार आणि अनेक समर्थक उपस्थित होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुनेत्रा पवार…

Read More

गृहकारभार पांडू हवालदार चालवतायत!:हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 26 जुलैच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आक्रोश, लोकशाहीचे संरक्षण आणि केंद्रीय…

Read More

राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चेला यावं:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आव्हान, म्हणाले- विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर राजकारण करू नका

नीट पेपर लीक प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी संसदेत येऊन चर्चा करावी, असे खुले आव्हान देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण करू नये, असेही म्हटले. फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांच्यात खरोखर हिंमत असेल, लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल…

Read More

नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर चिंता व्यक्त.

पुण्यात वंचित बहुजन आघाडीने नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शनिवारवाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी…

Read More

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद:विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू- राज ठाकरे

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर राज्यातील घडामोडी आणि सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत आहे. दोन्ही ठाकरे बंधू कोणती भूमिका मांडणार आणि कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वृत्त सातत्याने अपडेट…

Read More

फास्ट ट्रॅक कोर्टचे स्वागत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कधी?:पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवारांचा सवाल

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आभार मानत स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

Read More