धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी:डीपीआर प्रक्रिया सुरू, लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या बहुप्रतीक्षित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. सर्वेक्षणानंतर राज्य शासन, नीती आयोग व अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पुढील टप्प्यांचा निर्णय घेतला जाईल….