Headlines

राज्यात 24 तासांत 12.2 मिमी पाऊस:अपेक्षेपेक्षा 11.9% कमी, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात जोरदार, तर उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यात मध्यम धारा

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला. 21 जुलै सकाळी 8.30 वाजता झालेल्या नोंदीनुसार गेल्या 24 तासांत 12.2 मिमी पाऊस झाला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम धारा कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. या वर्षीच्या पावसाळ्यात 21 जुलैपर्यंत राज्यात 380.2 मिमी पाऊस झाला आहे. या…

Read More

Ajit Pawar Jayanti Special; Maharashtra Political Legacy & Life Journey

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज जयंती. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असून, राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दरवर्षी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती राज्यभर . महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक वेगळाच दरारा निर्माण करणारे, प्रशासनावरील घट्ट पकडीसाठी ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या…

Read More

एस.टी. कामगार सेनेचा उपोषणाचा इशारा:प्रलंबित मागण्यांसाठी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोविड काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एस.टी. कर्मचारी व पर्यवेक्षकांना शासन नियमांनुसार विशेष कोविड…

Read More

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात छायाचित्र प्रदर्शन:निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके, ग्रामस्वच्छतेचा संदेशही दिला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे बाबा अध्यासन केंद्र आणि समर्थ गुरुकृपा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (शिंदे बुद्रुक) संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी भरवण्यात आली. यासोबतच निबंध स्पर्धाही घेण्यात आली, ज्यात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा…

Read More

संगारेड्डी येथे भीषण अपघात:नांदेडच्या एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर झालेल्या भीषण अपघातात नांदेड शहरातील एका कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे नांदेड शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील बागबान कॉलनी, मस्जिद कुबा गल्ली परिसरातील एक कुटुंब कारने हैदराबाद विमानतळाकडे जात होते….

Read More

तैलिक महासभेने 200 विद्यार्थ्यांचा सत्कार केला:25 महिलांना शिलाई मशीन; रामदास तडस, नवनीत राणा उपस्थित

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच २५ गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस आणि भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वच्छता जनजागृतीसाठी पथनाट्य सादर:"सफाई अपनाओ, बिमारी भगाओ" अभियानांतर्गत जिजाऊ चौकात आयोजन

छत्रपती संभाजीनगर येथे “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” या विशेष स्वच्छता जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मनपाच्या IEC टीमद्वारे आयुक्त अमोल येडगे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य जिजाऊ चौकात सादर झाले. प्रभाग क्रमांक ०७ च्या पुढाकाराने प्रभाग ०७, ०८ आणि १० च्या संयुक्त सहभागातून हा कार्यक्रम पार पडला. बालविकास…

Read More

अमरावती जिल्ह्यात 24 तासांत 11.7 मिमी पाऊस:चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक 30.6 मिमी पावसाची नोंद

अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत सरासरी ११.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महसूल विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक ३०.६ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या दहा दिवसांच्या उघडीपनंतर सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरणीचे संकट काही…

Read More

पुणे भाजपद्वारे रक्तदान महायज्ञ; 1 लाख बाटल्यांचे उद्दिष्ट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पुणे शहर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १ लाख रक्ताच्या बाटल्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त २६ मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात…

Read More

लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे 360 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान:10 वर्षांच्या शैक्षणिक सहप्रवासाची संधी; '2Morrow 2Gether' प्रकल्पाची सुरुवात

मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लीला पूनावाला फाउंडेशनने (LPF) आपल्या कार्याच्या ३१व्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘2Morrow 2Gether’ या शालेय प्रकल्पांतर्गत फाउंडेशनने ३६० विद्यार्थिनींना १० वर्षांच्या शैक्षणिक सहप्रवासाची संधी दिली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन पुण्यातील नूराह-अल-बस्साम सभागृहात करण्यात आले. या समारंभात पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील इयत्ता ७ वी व ८…

Read More