Headlines

Maharashtra Farm Loan Waiver List Release Date; Dattatray Bharne News

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, 30 जुलैपूर्वी प . एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीला विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. सुरुवातीला 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा…

Read More

Sunetra Pawar Appeals To Join Gyanbharatam Manuscript Survey

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. असंख्य संत, संशोधक, विचारवंत आणि विद्वान यांच्या योगदानातून हा अमूल्य ज्ञानसाठा निर्माण…

Read More

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का?:देशात लोकशाही उरलीये की दडपशाही?- अमित ठाकरे आक्रमक

दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि आंदोलकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा तीव्र निषेध करत सरकारवर गंभीर आरोप केले. ‘ही लोकशाही की दडपशाही?’ आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर संताप व्यक्त करताना…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्री शुभा गोडबोले यांची कॅन्सरशी झुंज:केमोथेरपीनंतरच्या 'केमो कर्ल्स'ची भावुक पोस्ट चर्चेत

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतेच कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती देत उपचारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून त्यांच्या कॅन्सरवरील उपचारांचा आणि केमोथेरपीनंतर झालेल्या बदलांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शुभा गोडबोले…

Read More

पुण्यात प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तरुणीवर चौघांकडून बलात्‍कार:वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा, चौघांना अटक

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका २० वर्षीय तरुणीवर मुख्य आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याच्या आणखी ३ मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार करण्यास पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लैगिक, धमकी…

Read More

अडीच लाख वैष्णवांचा ‘माउली.. माउली’चा गजर अन् अश्वांची दौड!:संत ज्ञानेश्वर पालखीचे सोलापूर जिल्ह्यातपहिले गोल रिगण

“माउली… माउली’च्या अखंड जयघोषात आणि सुमारे अडीच लाख वैष्णवांच्या साक्षीने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. अश्वांची डोळे दिपवणारी दौड आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटे नातेपुते येथून प्रस्थान ठेवल्यानंतर, मांडवे ओढा येथे विश्रांती घेत दुपारी दोन वाजता पालखी पुरंदावडेच्या रिंगणस्थळी पोहोचली….

Read More

नाथ महाराजांच्या पायी दिंडीत 6 हजार वारकऱ्यांवर उपचार:रेड स्वस्तिक सोसायटीची 17 वर्षांची अविरत आरोग्यसेवा‎

संत एकनाथ महाराजांची आषाढी पायी दिंडी पंढरीच्या वाटेवर भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. या पायी प्रवासात वारकऱ्यांच्या चरणांची आणि आरोग्याची काळजी घेण्याचे पवित्र काम रेड स्वस्तिक सोसायटी (छत्रपती संभाजीनगर शाखा) गेल्या १७ वर्षांपासून अविरत करत आहे. यंदाही या सेवेचे व्रत जोपासत, दिंडीच्या अवघ्या पहिल्या १२ दिवसांत तब्बल ६ हजार वारकऱ्यांवर वैद्यकीय उपचार करून मोफत औषधांचे वाटप…

Read More

पावसाची प्रतीक्षा:श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट! पाऊस गायब आणि विहिरी कोरड्या

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जून महिना कोरडा गेल्यावर, जुलैतील सुरुवातीच्या पावसावर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र, आता पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांमुळे करपू लागली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे महागडे बियाणे, खते आणि मेहनत वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा पुरता हतबल झाला असून…

Read More

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नका:दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरूये बघताय ना?; रोहित पवारांचा थेट इशारा

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष वस्तूस्थिती यामध्ये मोठा फरक असून, सरकारने शेतकऱ्यांशी राजकीय डावपेच खेळणे थांबवावे, अन्यथा पेचात पडाल,” असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ट्विटर एक्सवरुन त्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अटीशर्तींचा कोलदांडा…

Read More

पेपरफुटीला जबाबदारांवर कारवाई करा:भीमशक्ती संघटनेची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

नीट पेपरफुटीची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली. यासाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याच अनुषंगाने दिल्लीतील पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणालाही संघटनेने पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी…

Read More