Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘थीम पार्क’ अन् ‘पर्यटन सर्किट’च्या घोषणा हवेतच, जन्मभूमीतच सावरकर पार्कची दशा




स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमध्ये ‘सावरकर थीम पार्क व संग्रहालय’ आणि देशातील पहिले ‘सावरकर पर्यटन सर्किट’ उभारण्याची घोषणा चार वर्षांनंतरही कागदावरच राहिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी पर्यटन महामंडळाकडून 100 कोटींच्या निधीची घोषणा होऊन पहिल्या टप्प्यातील 10 कोटी मंजूर झाले होते. या ठिकाणी वस्तू संग्रहालय, आकर्षक सजावटीसह उद्यान देखील उभे राहिले. परंतु, काही महिन्यांतच देखभाल-दुरुस्तीअभावी या उद्यानासह संग्रहालय धूळखात पडले असून, ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत हा कोट्यवधींचा खर्च भंगारात गेल्याची धक्कादायक बाब उद्यानस्थळी दिसून आली. भगूर नगरपालिकेच्या जागेत पर्यटन विकास महामंडळाकडून ही सावरकर थीम पार्क व संग्रहालयाची वास्तू उभी राहिली आहे. मात्र, पर्यटन मंडळ व नगरपरिषद या दोघांच्या हस्तांतरणाच्या वादात सावरकरांच्या भूमीतच त्यांच्या नावाच्या वास्तूची अवहेलना होत आहे. 26 फेब्रुवारी 2023 रोजी तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रकल्पाची घोषणा केली होती. मे 2023 मध्ये निविदा मागवून 28 मे 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या घोषणा केवळ हवेतच विरल्या असून प्रत्यक्षात प्रकल्पावर काम झालेले नाही. राजकीय उदासीनता व प्रशासकीय विलंबाचा फटका या महत्त्वाच्या प्रकल्पाला बसला आहे. 6 महिन्यांत थीम पार्क होणार सुरू नगरपरिषदेने उभारलेली वास्तू, उद्यानाची दुरावस्था झालेली असली तरी पर्यटन महामंडळाने नव्याने 45 कोटींचा आराखडा मंजूर केला. त्यातील 10 कोटी प्राप्त झाले आहेत. सहा महिन्यांच्या आत थीम पार्कचा पहिला टप्पा खुला केला जाईल. – महेश बागुल, वरिष्ठ अभियंता, एमटीडीसी काय होते ‘पर्यटन सर्किट’? सावरकर पर्यटन सर्किटअंतर्गत भगूरमधील सावरकर उद्यान, अष्टभुजा देवी मंदिर, नाशिकमधील अभिनव भारत मंदिर, पुण्यातील सावरकर अध्यासन केंद्र, रत्नागिरीचे पतितपावन मंदिर आणि सांगलीतील ऐतिहासिक स्थळे जोडण्याचा समावेश होता. पर्यटन विभागाची उदासीनता पर्यटन विकास मंडळाने 100 कोटींच्या निधीची घोषणा केली खरी, पण प्रत्यक्षात आज ही सावरकर थीम पार्क व संग्रहालयाची वास्तू धूळखात पडून आहे. पालिकेने उभारलेले उद्यान आणि संग्रहालयाची इमारत निधीअभावी धूळखात आहे. – प्रेरणा बलकवडे, नगराध्यक्ष, भगूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *