तीन जलकुंभाची उभारणी, 99 लाखांचा खर्च तरीही गाव तहानलेलेच:पिंपळखुटा गावातील प्रकार; नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल तीन जलकुंभाची उभारणी झाली तसेच 99 लाख रुपयांचा खर्च झाल्यानंतरही गाव तहानलेलेच असून या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 21 केली आहे. पिंपळखुटा गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर झाले होते. याकामांवर…