Headlines

इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांचे प्रतिपादन:पर्यावरणासाठी इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा आणि अनुभवांमधून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वनस्पतीशास्त्रज्ञ, दुर्ग व इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराई आणि इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहासातील पर्यावरण’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्वा. सावरकर…

Read More

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती मिळतील:निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विधान भवनात मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न…

Read More

दीक्षाभूमी स्मारक समितीचा वाद चिघळला:भंते ससाईंना हटवून विलास गजघाटे अध्यक्षपदी नियुक्त

दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. समितीचे अध्यक्ष आणि धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमताने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला. डॉ. गवई यांच्या मते, भंते सुरेई ससाई…

Read More

महाराष्ट्र पोलिसांसाठी 'एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म':गुन्हे तपासात 'एआय' आणि 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर

महाराष्ट्र पोलिसांच्या ताफ्यात लवकरच एक अत्याधुनिक यंत्रणा सामील होणार आहे. गुन्ह्यांचा तपास अधिक काटेकोर, पारदर्शक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा बनवण्यासाठी ‘एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म’ विकसित केला जात आहे. राज्य सरकारच्या ‘मार्व्हल’ (MARVEL) या विशेष उद्देश संस्थेद्वारे ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली तयार केली जात आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला राज्यातील दोन पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत एक तासात आटोपली समुपदेशन प्रक्रिया:32 केंद्र प्रमुखांना मिळाले नियुक्ती आदेश, CEO गायकवाड यांचा पुढाकार

हिंगोली जिल्ह्यात सरळ सेवेने भरती झालेल्या ३४ पैकी ३२ केंद्र प्रमुखांना मंगळवारी ता. २३ समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. अवघ्या एक तासात समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुख मिळाल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होणार आहे. या शिवाय गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सुमारे १ हजार प्राथमिक शाळांसाठी ६८ केंद्र आहेत. त्यापैकी…

Read More

राज्य सरकारची कर्जमाफी फसवी:ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली योजना; आमदार अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026 ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना आहे. या योजनेतील अटी-शर्ती पाहता शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार याबाबत मोठी शंका आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 260…

Read More

खासदाराला मिळणाऱ्या 5 कोटी रुपयांचे नेमके काय होते?:'खासदार निधी'चा (MPLADS) ए टू झेड इतिहास, जाणून घ्या, नवे नियम आणि तुमचा अधिकार!

निधी मिळत नाही, निधी पुरत नाही, मतदारसंघातील जनतेची कामे झाली पाहिजेत, असे सांगत खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष बदलल्याचे आपण नुकतेच पाहिले असेल. नुकताच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी अशीच कारणे देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर खासदारांच्या अखर्चिक निधीचा मुद्दाही गाजला. यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले होते. यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांसमोर…

Read More

नंदगावचा अ‍ॅश बंड ठरतोय घातक:महाजेनकोच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यावरण, पशुधनाचा जीव धोक्यात

महाजेनकोच्या नंदगाव येथील अ‍ॅश बंड (राखेचा बंधारा) मधील अयोग्य आणि अशास्त्रीय राख विल्हेवाटीमुळे स्थानिक पर्यावरण, नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. नंदगाव परिसरातील पाळीव जनावरांना चरण्यासाठी याच अ‍ॅश बंड ओलांडून जावे लागते. राख साचलेल्या दलदलीतून आणि प्रदूषित पाण्यातून…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला; प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात घसघशीत वाढ करण्याची घोषणा आज विधानसभेत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक…

Read More